Hot Posts

6/recent/ticker-posts

*ग्रामपंचायत रणांगणात देसाई-पाटणकर आमनेसामने.*


पाटण:/प्रतिनिधी 
_*पाटण तालुका राजकीय वार्तापत्र_*
पाटण तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीस जोरदार सुरुवात झाली असून त्या निमित्ताने पारंपारिक विरोधक आमदार शंभुराजे देसाईचा गट विरूद्ध माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटांत कांटे कि टक्कर होत आहे.सुरू झालेल्या निवडणुकीत १६ ग्रामपंचायतीत १६ सरपंच व २१४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. बाकी ७० ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. दरम्यान पाटण प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची पूर्ण तयारी केली आहे. तालुक्यातील प्रमुख गावच्या  लढतींपैकी चाफळ,रासाठी,येराड,अडूळपेठ,नाडे, मारूलहवेली,नाटोशी, ढेबेवाडी,म्हावशी,कडवे,सणबुर या ठिकाणी जोरदार लढती होत आहेत.
या निमित्ताने पाटण तालुक्यात  युवा नेते सत्यजित पाटण,आमदार शंभुराजे देसाई,आमदार नरेंद्र पाटील,सारंगबाबा पाटील,हिंदुराव पाटील,भरत पाटील आदी प्रमुख नेत्यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावले आहे.
*संजय कांबळे*  *पाटण प्रतिनिधी*

Post a Comment

0 Comments