दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस. भारतीय संस्कृतीत या दिवशी गायीची पुजा करण्याची प्रथा आहे. भारत हा पुर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सर्व सणांची योजना करतांना प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विचार केलेला दिसून येतो. पावसाळ्यानंतर खरीपाची पिके हातात आली आणि शेतकऱ्यांचे घर धनधान्याने भरले की येणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या समृध्दीला कारणीभूत असते ती, गोमाता म्हणून पहिल्यांदा तिचे पुजन कराचये. पुर्वी राजांची श्रीमंतीसुध्दा गोधनावर मोजली जात होती. गायीचे दान सर्व श्रेष्ठदान समजले जात होते. या परंपरेमध्ये अंधश्रध्दा नव्हती तर विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारी शास्त्रशुध्दता होती. म्हणूनच कदाचित म्हटले गेले आहे की, “गावो विश्वस्य मातरा:” म्हणजेच गाय ही विश्वाची माता आहे. गायीचे वैज्ञानिक महत्व जाणूनच आपल्या ऋषिमुनीनी तीला धार्मीक महत्व प्राप्त करुन दिले आहे.
एकविसाव्या शतकातील पृथ्वीचे तापमान, नष्ट होणारी जंगले, पाणी आणि जमिनीचे प्रदुषण, पर्यावरणातील बदलामुळे शेतीवर येणारी संकटे, वाढती लोकसंख्या, धान्य व औषधी यांचे गुण कती झाल्यामुळे वाढलेले अनारोग्य अशा अनेक समस्या आपल्यापुढे उभ्या आहेत. पण अजूनही हे सर्व थोपविण्यासाठी आपल्याकडे एकच उत्तर शिल्लक आहे. ते म्हणजे भारतीय वंशाची गाय. कृषी, उर्जा, आरोग्य , पर्यावरण, उद्योग या सर्व क्षेत्रांना गाय हे उत्तम वरदान आहे. गायीचे दुध, दही, लोणी, ताक, तूप, मुत्र, शेण हे सर्व उपयोगी पडणारे घटक आहेत. गायीचे दुध हे जीवन देणारे दिर्घकाळ निरोगी आयुष्य देणारे आहे. म्हणूनच आयुर्वेदाचे वाग्भटाचार्य म्हणतात “गव्यं तु जीवनीयम् रसायनम्” गायीचे दुध हे म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलके आहे. कारण यात स्निग्ध घटक कमी आहेत. नवजात बालकाला आईचे दुध उपलब्ध झाले नाही तर पर्याय म्हणून प्रथम शेळीचे नाहीतर गायीचे दुध वापरता येते. गाईचे दुध बुध्दीवर्धक असते. गायीच्या दुधात अनेक जीवनसत्वे आणि भरपूर कॅलशियम असते. क्षय, यकृताचे विकार, वृक्काचे विकार, जलोदर यामध्ये गायीच्या दुधाचा उत्तम गुण येतो. गायीच्या दुधापासून विरजण लावून दही बनवले आणि नंतर घुसळून ताक केले तर हे तयार झालेले ताक आणि लोणी हे दोन्ही पदार्थ अतिशय उत्तम आहेत. मुळव्याध, पचानाचे विकार यात ताक हे उत्तम औषध आहे. आपल्या पुराणकथामध्ये बाळ कृष्णाने अनेक वेळा लोणी चोरुन खाल्याचा उल्लेख आहे. किशोरावस्थेत ( ८ ते १४ वर्ष वयोगटात) लोणी खाल्यामुळे शरीरातील सर्व रस रक्तादी, धातू चांगले होऊन शरी निरोगी राहते. बाळकृष्णाने जणू किशोरवयात लोणी खाऊन सर्वांना लोण्याचे महत्व पटवून दिले आहे. गर्भाची वाढ होताना चौथ्या महिन्यात हृदय व्यक्त होते. त्यावेळी गर्भीणीने लोण्याचा आहार घ्यावा असे सांगितले आहे.
गायीचे तुपाचे महत्व तर अवर्णनीय आहे. मानवी मेंदूच्या पेशीतील स्निग्ध पदार्थ आणि तूप यांच्या रासायनिक दृष्ट्या विलक्षण साम्य आहे. त्यामुळे साहजिकच गायीचे तूप अत्यंत बुध्दीवर्धक आहे. गोमुत्र हे कृषी आणि अरोग्य यांच्या जणू नवसंजीवनीच आहे. गोमुत्रापासून उत्तम किटकनाशके बनविण्यात येतात. श्विाय ही किटकनाशके नैसर्गिक असल्याने हवा, जमिन, पाणी यांचे प्रदुषणही करत नाहीत. कॅन्सरजनक किटकानाशकांना हा उत्तम पर्याय आहे. शेतीसाठी तर गोमुत्र उत्तम वरदान आहे. कॅन्सर, यकृताचे विकास, वृक्काचे विकास, वजन वाढणे, दमा, त्वचा विकास अशा काही निवडक आजारांवर गोमुत्र उत्तम औषध आहे. गायीचे शेण हे पृथ्वीतलावरचे एक महान औषध आहे. रासायनिक खते एकतच महाग असतात आणि ती सतसत वापरल्यास शेती नापीक होते. यामुळे उगवणारे धान्य हे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढवत आहे. याउलट शेणखत जमिनीचा सुपीकपणा वाढवते. शेतकऱ्यांकडे गाय,बैल असल्यास हे खत फुकटच मिळते. शिवाय पिकांना आवश्यक ते पोषकांश मिळतात. गायीचे शेण हे घात रेडीयशन थोपवू शकतात. म्हणूनच आतात या शेधापासून टाईल्स, छप्पर बनविण्याचे उद्योग चालू आहेत. पुर्वीच्या काळी आपल्याकडे घर शेणाने सारविण्याची पध्दत होती. ही पध्दत किती शास्त्रशुध्द आहे हे आता सिध्द होत आहे. गायीच्या शेण्या जाळल्या असता हवेतील रोगजंतू व डासांचा नाश होतो. पुर्वी आपल्याकडे होळीला रानशेण्यांची व शिशिरातील पानगळती झालेल्या पानांची होळी केली जात असे. यज्ञामध्ये गायीच्या शेण्या, तूप व पवित्र औषधे वनस्पतींच्या समिधांची आहूती दिली जाई. मोठ्या प्रमाणात केले जाणारे हे एक निर्जंतूकीकरणच होते.
थोडक्यात कृषी रोजगार उर्जा, पर्यावरण, आरोग्य, अशा विविध क्षेत्रांना गाय आधारभूत आहे. अशा पुण्यस्वरुप गायीला शतश: प्रणाम.

0 Comments