वरकुटे-म्हसवड / दीपक काटकर
म्हसवड शहरात डेंग्यू, चिकणगुण्या, मलेरिया या साथीच्या आजाराने थैमान घातले असून हजारो नागरिक या आजाराने हैराण झाले आहेत.शहरातील सर्व हाॅस्पीटल हाॅऊस फुल्ल झाली असून प्राथिमिक आरोग्य केंद्रात गोरगरिबांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एका शाळकरी मुलाचा या आजाराने बळी घेतला आहे. ही साथ लवकर आटोक्यात आणण्यात अपयश आले. आणि जर ही साथीची लाट उसळली तर शहरात वादळ निर्माण होऊन लोकांचे नाहक बळी जातील अशी भिती व्यक्त होत असून एवढी भयानक परिस्थिती असूनही जिल्हा प्रशासन अंधारात कसे ? पालिका प्रशासन व आरोग्य विभाग एवढे दिवस झोपा काढत होता का ? अजून किती बळी जाण्याची वाट पहात आहे.अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकामधून व्यक्त होत आहेत.
पालिका हद्दीत एक महिण्यापासून पासुन विविध रोगाच्या साथींनी नागरीकांना पछाडले असुन आजवर शहरातील बहुतांशी खाजगी दवाखान्यात चिकन गुनिया ,डेंग्यु, मलेरीया यासारख्या साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत असुन वरील आजाराने जनता हैराण झाली असून, याबाबत पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसुन येत असून उशीरा जागे झाले आहे. तर आरोग्य विभागाकडुन या साथींवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.या आरोग्य केंद्रात या आजारांवर उपचार करण्यासाठी कोणतीही उपाय योजना नाही.या ठिकाणी सुमारे 30 हजार लोक संख्येच्या शहरासाठी अत्यंत कमी कर्मचारी वर्ग आहे.एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वरिष्टांना अंधारात ठेवले गेले.वरिष्टांना साथीच्या आजाराची कल्पना नसणे हे खेदजनक आहे. प्रत्येक विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.यावरून सबंधित लोकांच्या जिवाशी खेळतना दिसत आहेत. आठवड्यापुर्वी वैदू समाजातील एका शाळकरी निष्पाप मुलाचा साथीच्या आजाराने आक्समिक मृत्यू झाला.त्याची आई बहिणही आजारी आहेत. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पालिका प्रशासन नेमके काय काम करते व सत्ताधारी मंडळी पालिकेत काय करतात ? असा तीव्र प्रतिक्रिया शहरवासिय जनतेतून उमटत आहेत.
म्हसवड हे माण तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले शहर असुन याठिकाणी क वर्ग असलेली सर्वात जुनी नगरपरिषद आहे. शहरात लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री. सिध्दनाथ माता जोगेश्वरी चे मंदिर आहे या देवाच्या दर्शनासाठी शहरात भाविकांची दररोज मोठी रेलचेल सुरु असते.तर येथे मोठी बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकही या ठिकाणी येत असतातया मुळे मोठी वर्दळ होत असते.गत नऊ महिण्यापुर्वी पालिकेत सत्तातर होऊन लोकांनी परिवर्तन घडवले.यामुळे शहरात अपेक्षित विकास होईल अशा भोळ्या आशा जनतेत निर्माण झाल्या होत्या त्या अपेक्षा पुर्ण पणे फेल ठरल्या असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.पालिकेतील सत्ताधारी व प्रशासन यांच्या मध्ये एकमत होत नाही. सर्व आघाड्यांवर विकास कामे करण्यात अपयश आले आहे.शहरातील गटारे वेळेवर काढल्या जात नाहीत. गटारी कधी काढल्या तर काढलेली घाण लवकर उचलली जात नाही.पावसामुळे शहरात ठिकठिकाणी गवत झाडे झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे साथीच्या विविध रोगांचा फैलाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. या साथीच्या रोगांना अनेक कुठूंबच्या कुठूंब बळी पडली असून अनेक कुठूंबांचे आथिर्क गणित पुर्णपणे कोलमोडल्याने दिवाळी अगोदरच त्यांचा खिसा खाली झाला आहे. शहरातील अनेक खाजगी मोठी रुग्णालये व छोटे दवाखान्यांची संख्या मोठी आहे. शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था बनली आहे.हे आरोग्य केंद्र राज्यातील एक आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र असताना काही जणांनी नुकतीच आरोग्यकेंद्रात जाऊन फोडतोड डाॅक्टरांना शिवीगाळी 108 रूग्णसेवा गाडीचे नुकसान केले गेल्याने या ठीकाणी डाॅक्टर व कर्मचारी काम करण्यास धजवत नाहीत. या मुळे साथीच्या आजाराच्या काळात गरिब लोकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सध्या या आरोग्य केंद्रासह शहरातील विविध रुग्णालयासह छोट्या दवाखान्यात पालिका हद्दीतील बहुसंख्य नागरीक हे चिकुन गुण्या, डेंग्यु, मलेरीया सारख्या आजाराने ग्रासल्याने आपल्यावर उपचार करुन घेत आहेत.
तरी पालिकेतील सत्ताधारी मंडळीनी एक वर्षापूर्वी पालिका निवडणूकीत शहरवासीयांना दिलेली आश्वासने आठवावीत. जे स्वच्छ व सुंदर म्हसवड रोगराई मुक्त शहर या घोषणा निवडणूकी पूरत्याच होत्या का ? ज्यांच्या नेतृत्व वावर विश्वास ठेवून म्हसवडच्या जनतेने पालिकेत परिवतँन घडवून परिवतँन पँनलला सत्तेवर बसवले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखरभाऊ गोरे म्हसवड शहरातील नागरीकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन पालिकेतील सावळ्या गोंधळाचा कारभार सुधारणार आहेत का ? असा प्रश्न शहरवासीयांतुन विचारला जात आहे.
थेट जनतेतून निवडूण आलेले नगराध्यक्ष जनतेसाठी थेट काहीतरी करतील अशी जनतेकडून अपेक्षा आहे.मात्र नऊ महिण्याचा काळावधी झाला तरी अजून त्यांना सुर सापडलेला दिसत नाही.लोकांच्या माफक अपेक्षा आहेत.पुर्वीच्या काळात पाणी येत होते तेवढेच पाणी द्यावे. शहरासह वाड्यावस्यांवरील गटारांची साफसफाई करणे हे दोन प्रश्न प्राधान्याने हाती घेऊन जनतेला दिलासा देण्याची माफक अपेक्षा आहे.
मात्र आज शहर साथीच्या आजाराने हैराण आहे.शहरात उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नसल्याने लोकांना रोजगार उपल्बध होत नाही.त्यात लोकांचे आजाराचे प्रमाण वाढले आहे.दवाखाने हाॅऊसफुल्ल होत आहेत.उपचारासाठी पैसे नाहीत.पुर्ण कुटूब आजारी आहे.केवळ पैश्याअभावी ओंकार शिंदे या शाळकरी मुलाचा बळी गेला याला जबाबदार कोण?पालिका प्रशासन ढिम्म असल्यामुळेच शहरवासियांना साथीच्या आजारांना बळी पडावे लागले.डेग्यू,चिकणगुण्या, मलेरिया या आजाराचा सणगरगल्ली केंद्रबिंदू आहे.या गल्लीतील बहुतांश घरात याआजाराने थैमान घातले असून घरातील प्रत्येक सदस्य आजारी पडत आहे.अनेक कुटुबांचे उपचारासाठी हजारो रूपये नाहक खर्च झाले आहेत.माळीगल्लीत तर एकूलत्या एक वंशाचा दिवा असलेल्या ओंकार शिंदेचा बळी गेल्याने या कुटूबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.भगवानगल्लीतही अशीच आवस्था आहे.या आजारानी शहरेला विळखा घातला आहे.दररोज या आजाराने बाधित झालेले नागरिक सकाळ संध्याकाळ दवाखान्याची वाट धरत आहे.अनेक हाॅस्पीटल मध्ये सलाईनवर आहेत.एक एकाला पन्नास पर्यंत सलाईन लावल्या जात आहेत.
काही हाॅस्पीटलचे डाॅक्टरही या आजाराचे रूग्ण आहेत.एक नगरसेवकही आजारी आहे.दररोज ताप येत असलेल्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे.एवढा जिवघेणा संघर्ष जनता करत असताना मात्र मतांचा जोगवा मागणारे नेत्यांनी मात्र याकडे डोळेझाक केली आहे. आ.जयकुमार गोरे यांनी येऊन आढावा घेतला.दवाखान्या मध्ये जाऊन चौकशी केली.मात्र ते एवढे दिवस का फिरकले नाहीत ? तर परिवर्तन पॅनलचे राष्ट्रवादीचे नेते शेखरभाऊ गोरे यांनीही पालिकेत सत्ता असतानाही पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे त्यांनी अजूनही शहरातील परिसाथितीची पहिणी केलेली नाही.या भिषण परिस्थिती मध्ये राजकारण बाजूला ठेऊन ही रोगराई दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.अन्यथा काही दिवसात म्हसवड शहरात आजारी रूग्णांच्या छावण्या उघडाव्या लागल्या शिवाय राहणार नाहीत.
या साथाची लाट अटोक्यात आणण्यासाठी शहरात पाच तंज्ञ डाॅक्टरांचे पथक नेमून लोकांवर उपचार करण्याची गरज आहे.परिस्थिती गंभीर असून पालिका प्रशासन व आरोग्य विभागाने हातात हात घालून एकदिलाने काम करण्याची गरज आहे.
नागरिकांनीही या परिस्थितीचे गाभिर्य ओळखून यावर मात करण्यासाठी पालिकेला व आरोग्य विभागाला पुर्ण सहकार्य करून सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

0 Comments