सातारा : चाफळ, ता. पाटण येथील श्री समर्थ विद्यालयाची कु. साक्षी प्रमोद पाटील हिने 38 किलो वजन गटात विभागीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दरम्यान, कु. अदिती प्रदीप बाबर हिने 30 किलो वजन गटात विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विजेत्या खेळाडूंना क्रिडा शिक्षक, मुख्याध्यापक ए. व्ही. रामुगडे, संजय पाटील, प्रदीप बाबर, दिलीप साळुंखे, आनंदा महिपाल, संतोष तिकुडे यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या खेळाडूंचे सरपंच सौ. अलका पाटील, उपसरपंच अंकुश जमदाडे, दै. ग्रामोध्दारचे उपसंपादक एकनाथ थोरात यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

0 Comments