श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या संगम माहूली येथील कैलास स्मशानभूमीत कै. नलिनी बाळकृष्ण आंबेकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ अत्याधुनिक विद्युतीकरण करण्यात आले आहे. लोकवृत्तचे संपादक श्री.सुजीत आंबेकर यांनी आपल्या मातोश्री कै.नलिनी बाळकृष्ण आंबेकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ विद्युतीकरणाचे काम केले आहे. कैलास स्मशानभूमी व परिसरामध्ये विविध ठिकाणी हाय मॅक्स,एल.ई.डी व टयूब लाईट बसविण्यात आल्या असून याचा शुभारंभ जिल्हाधिकारी मा.श्वेता सिंघल,पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्मशानभूमीतील शंकराच्या मुर्तीस पूष्पहार अर्पन करून कै.नलिनी बाळकृष्ण आंबेकर यांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली.
जिल्हाधिकारी मा.श्वेता सिंघल यांनी स्मशानभूमीची पाहणी करून आपले मनोगत व्यक्त करताना बर्यापैकी स्मशानभूमी दुर्दशीतच असतात. अशा प्रकारची स्मशानभूमी मी प्रथमच पहात असून प्राथमिक गरजांबरोबर अत्याधुनिक असणार्या सुविधा पाहून दु:खद प्रसंगी सकारात्मक विचार केल्यास सुखद अनुभव येत असतो याचा अनुभव याठिकाणी मी घेत असून स्वर्गातून आपल्या मातोश्री आपणांस आर्शिर्वाद देत असतील असे म्हणून सुजीत आंबेकर यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली व असेच सामाजिक उपक्रम आपल्या कढून व श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून व्हाव्यात यासाठी शुभेच्छा दिल्या.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच जाणिवेतून व अंधारातून प्रकाशाकडे या सुविचाराने सुजीत आंबेकर यांनी केलेले कार्य म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे. असे म्हणून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सुजीत आंबेकर यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. एक वेगळा विचार केल्या नंतर कशाप्रकारे निर्मिती होती याचे उदाहरण म्हणजे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने उभा केलेली स्मशानभूमी होय असे म्हणून त्यांनी पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख या म्हणाल्या की,आंबेकर कुटूंबियांनी अतिशय मोलाचे व पुण्याईचे काम केले आहे. श्री बालाजी चॅरिटेबलने उभ्या केलेल्या स्मशानभूमीच्या कार्यात आंबेकर परिवाराने खारीचा वाटा उचलला असून समाजाने यातून प्रेरणा घेऊन पुढे येऊन सहकार्य करावे अशी आशा व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.
सुजीत आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आईच्या अंत्यसंस्कारवेळी रात्र होती, स्मशानभूमीत लाईट होती परंतू प्रकाश कमी प्रमाणात होता,त्यावेळीच मला स्मशानभूमी प्रकाशमय करण्याची प्रेरणा मिळाली व पहिल्या स्मृतीदिनादिवशी विद्युतीकरण करण्याचा संकल्प व दृढ निश्चय करून मी श्री.राजेंद्र चोरगे यांचेशी संपर्क करून भावना व्यक्त केल्या. त्यांनी लगेच होकार देऊन यासाठी एक वषर्र् थांबण्याची तयारी दर्शविली व मी करणार असलेल्या कामाचे कौतुक करून योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य केले. आईचे स्मृतींना उजाळा देताना आईने मला सामाजिक कार्य करणे तसेच पैशाचे मागे लागू नको,माणुसकी आणि माणसं जप या संस्कारामुळेच माझे हातून हा उपक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगून सुजीत आंबेकर यांनी राजेंद्र चोरगे व श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.
कैलास स्मशानभूमीची थोडक्यात माहिती देताना पत्रकार शरद काटकर यांनी अतीवृष्टीच्यावेळी तीन वेळा स्मशानभूमी 80 ते 90% पाण्याखाली गेली असताना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही व साधी एक वीट सुध्दा जाग्यावरून हलली नाही. निसर्गाने सुध्दा कैलास स्मशानभूमीची चाचणी घेतली असे म्हणत श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची ही पोच पावती असल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलून दाखविले. गेली 15 वर्षे राजेंद्र चोरगे दररोज सकाळी याठिकाणी येऊन पाहणी करत असल्याचे सागूंन देखभाल व स्वच्छता याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. सुजीत आंबेकर यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी कैलास स्मशानभूमी ट्रस्ट व लोकसहभागातून उभी केल्याचे सांगून पारंपारिक पध्दतीने करण्यात येणार्या अंत्यसंस्कार विधिस फाटा देऊन गौर्याचा (शेण्याचा) वापर करून अंत्यसंस्कार करण्याची प्रथा चालू केल्यामुळे 20 वर्ष वाढ झालेली 20 ते 22 हजार वृक्षांची कत्तल थांबून वृक्ष संवर्धन झाले व प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले याची माहिती दिली व महिला बचत गटांना व्यवसाय उपलब्ध झाला. व्यसनमुक्ती व इतर सामाजिक उपक्रम प्रबोधनाचे कार्य स्मशानभूमीच्या माध्यमातून होत आहे. मरण हे सत्य आहे परंतू मृत्यू नंतरचा सुखकर प्रवास परमेश्वर आमच्या माध्यमातून करून घेत असल्याचे सांगितले.स्मशानभूमी उभारणीवेळीच्या आठवणी सांगताना देणगी गोळा करताना लोक म्हणायचे आधी काम करा,करून दाखवा मग मदत करतो असे म्हणायचे. आजपर्यंत विविध भागातील, प्रांतातील अनेक मान्यवर, सामाजिक संघटनांनी कैलास स्मशानभूमीस सदिच्छा भेट दिली असून काही ठिकाणी गौर्यात (शेण्यात) अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शाम देशपांडे यांनी तर बदली झाल्यानंतर आयोजित निरोप सभारंभात मला कोणत्याही ठिकाणी मरण आले तर सातारच्या कैलास स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावेत अशी आशा व्यक्त केली होती याची आठवण करून देऊन अशा अनेक घटना असून यावेळी त्यांनी सातारचे व्यापारी धनराज लाहोटी यांनी रू.अकरा हजार देणगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
कोणत्याही प्रकारचे शासकीय,निमशासकीय व इतर माध्यमातून अनुदान मिळत नसताना मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होण्याचे कार्य परमेश्वर आमच्याकडून करून घेत असल्याचा पुन:रुच्चार करून त्यांनी सुजीत आंबेकर व परिवाराने केलेल्या सहकार्याबद्दल व्यक्तिश: व श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त केले.
नगरसेवक श्रीकांत आबेंकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास सातारा जिल्हा करागृह अधीक्षक चौंबे साहेब,वन सर्वेक्षण अधिकारी अंजनकर साहेब,निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे,उप जिल्हाधिकारी संजय पाटील व स्वाती देशमुख,तहसिलदार निलप्रसाद चव्हाण,कराडचे आर.टी.ओ. अजित शिंदे,मंगलमुर्ती ग्रुपचे सयाजी चव्हाण,जय सोशल फौंडेशनचे सागर भोसले,जीटीपीएलचे प्रशांत आहेरराव,श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अंबाजी देसाई,संजय कदम,उदय गुजर,नितीन माने,जगदिश खंडेलवाल,संतोष शेंडे,हरिदास साळुंखे, जगदिप शिंदे,विश्वनाथ फरांदे,किशोर महामुलकर,सचिन भोसले,राजेंद्र कामटे माहुलीचे माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, तसेच महेंद्र बाचल,सागर लाहोटी,दिलीप पुरोहित,मनीष उधानी,अॅड.सचिन तिरोडकर, गणपत शिंदे, हेमंत लाटकर,तृशांत घोरपडे,धनंजय सावंत,रवी खत्री,भरत रावल,शिवाजी काळभोर, संजय जाधव,मनोज पवार,किशोर लोखंडे,मनोज लोखंडे,सचिन रणदिवे,कैलास निंबाळकर,बसु चव्हाण,रविंद्र टिले,महेश पाटुकले, धनंजय बारटक्के,मंगेश भुतकर,धनंजय हेंद्रे,दिपक खांडके,मोहन पुरोहित,धनराज लाहोटी,पंकज उत्तेकर,सागर भोगांवकर,घनशाम मंत्री,संतोष लांडगे,दिपक चव्हाण,बंडू सुर्यवंशी, अभिषेक गडकरी, महेंद्रकर, विविध क्षेत्रातील मान्यवर व जनसमुदाय उपस्थित होता.


0 Comments