Hot Posts

6/recent/ticker-posts

घोषणा वाढीची मात्र दर झाले कमी, मंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा


वरकुटे-म्हसवड / दिपक काटकर
       महाराष्ट्राचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या दुधदरवाढीच्या घोषणेनंतर जवळजवळ सर्वच दुधसंघांनी दुध खरेदीदर कमी करुन त्यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे.
       महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतक-यांचे हित लक्षात घेऊन ना.जानकरसाहेबांनी म्हैस व गायीच्या दुधाच्या खरेदीदरात तीन रुपये प्रती लिटर अशी वाढ केली जाईल असे जाहीर केले होते.पण याचा परिणाम उलटाच झाल्याचे दिसून येत आहे.
      दुध संघानी दुध खरेदीदर वाढवण्याऎवजी कमी करुन ना.जानकरांच्या  आदेशाची पायमल्ली केली आहे.या प्रकारामुळे दुध उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले असुन दुग्धोत्पादन हा शेतीपुरक व्यवसाय त्यांना परवडेनासा झाला आहे.
       दुभती जनावरे संभाळणे दिवसेंदिवस जिकिरीचे होऊन बसले आहे.वाढलेले गोळीपेंढीचे दर, कडबा व ओल्या चा-याचे दर, आैषधांच्या किंमती,डाॅक्टरची फी, हे सर्व करण्यासाठी राबणा-याची मजुरी याचा विचार केला तर गायीच्या दुधाचा दर प्रतीलिटर ३० रुपये व म्हैसीच्या दुधाचा दर प्रतीलिटर.असायला हवा पण तो तो २४ रुपये प्रतीलिटर असा आहे.तर शासनाने हाच दर २७ रुपये प्रतीलिटर घोषित केला आहे.
       ना.जानकर साहेबांनी जाहिर केलेला दर न देणा-या दुध संघांवर कडक कारवाई करण्याचे जाहीर केले असल्याने आता शेतकरी दुधाचे खरेदी दर केव्हा वाढणार याकडे डोळे लावून बसले आहेत.

Post a Comment

0 Comments