Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रीनपॉवर चा ३३०/-चा दुसरा हप्ता बँक खात्यावर वर्ग-हणमंतराव जाधव


औंध:- ग्रीनपॉवर शुगर्स लि. गोपुज या साखर कारखान्याने २०१६-१७ मध्ये गाळपासाठी ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी साठी दुसरा हप्ता ३३० रु.प्रति मे.टन प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव यांनी दिली.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की,दीपावली निमित्त सभासदाना १० किलो मोफत साखर तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाना धोरणाप्रमाणे टनेजच्या प्रमाणात रु.२० प्रति किलो प्रमाणे सवलतीच्या दरात साखर देणार असून तसेच कारखाना कर्मचारी याना ८.३३ प्रमाणे  एक संपूर्ण पगार बक्षीस दिला जाणार आहे.
चालु हंगामात कारखान्याने निर्धारित केलेल्या ऊस गळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसुन या वर्षी  सभासद,बिगर सभासद यांनी पिकवलेला ऊस कारखान्याकडे गळीतसाठी पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन हणमंतराव जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments