Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणी येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांचे भव्य रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न


मायणी:-
मायणी येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन व सातारा सिव्हील हॉस्पिटल ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले . यावेळी
पाटण विभाग प्रमुख अॅड. प्रल्हाद मोरे,मायणी पोलीस दुरक्षेत्रचे सपोनि संतोष गोसावी व मायणी येथील फाऊंडेशन प्रमुख अशोक तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान श्रेष्ठ दान,या उक्तीप्रमाणे आपले रक्तदान कोणाचा तरी जीवन वाचवणारे असते म्हणून रक्तदानास सर्वश्रेष्ठ  मानले जाते,असे मत अँड प्रल्हाद मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी असंख्य दात्यांनी या रक्तदानास आपला सहभाग नोंदवला .यावेळी सातारा सिव्हील हॉस्पिटल ब्लड बँक चे डॉक्टर, उपस्थित मान्यवर यांचे फाऊंडेशन तर्फे स्वागत करण्यात आले .मायणीतील सर्व मान्यवरांनी  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांचे तर्फे आयोजित या शिबिरास भेट दिली.

Post a Comment

0 Comments