सातारा : आनेवाडी टोल नाका ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जमाव व शस्त्र बंदीचा आदेश डावलून शासकीय विश्रामगृहावर बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्यासह शंभर समर्थकांवरशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अमोल मोहिते (रा. माची पेठ), अतुल चव्हाण, विनोद उर्फ बाळू खंदारे, माजी जिल्हापरिषद सदस्य राजू भोसले, विक्रम पवार, हरी साळुंखे (गुरूवार पेठ), फिरोज हबीबखान पठाण, बाळसाहेब महामुलकर, अमीत महिपाल, रवी पवार (सर्व रा. फॉरेस्ट कॉलनी व गोडोली), माजी नगरसेवक प्रवीण पाटील (रा. सोमवार पेठ), पंकज पवार (रा. कोडोली), आमदाराचा स्वीय सहाय्यक गणेश भोसले, बाळू दणाणे, राहुल सोनावणे, अनिकेत तपासे, सनी शिंदे, अक्षय कांबळे, आकाश नेटके, कैलास मायणे, संग्राम दणाणे, अजिंक्य दणाणे, प्रवीण उर्फ गोट्या तपासे (सर्व रा.
मल्हार पेठ), चेतन सोळंकी, बबलू सोळंकी (रा. सदरबझार), मुक्तार पालकर (गुरूवार परज), अक्षय अजित मोहिते, रविंद्र खरात (दोघे रा. गुरूवार पेठ),अन्सार आतार, योगेश दत्तात्रय शिंदे, मुन्ना सलीम बागवान (सर्व रा. शनिवार पेठ), संतोष कांबळे, योगेश चोरगे (दोघे रा. रविवार पेठ), निशीकांत पिसाळ, दत्ता तोडकर, सागर काळोखे (सर्व रा. करंजे), मयुर बल्लाळ (रा. प्रतापगंज पेठ), नाना इंदलकर (रा. तांदुळ आळी) यांच्यासह वाई, पाचगणी,खेडशिवापूर, रहिमतपूर व पुणे व सातारा येथील अन्य 100 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलावरून कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री खासादार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये सुरूची बंगल्यासमोर धुमश्चक्री झाली. तत्पूर्वी त्याच दिवशी सायंकाळी उदयनराजे यांनी आनेवाडी टोलनाक्यावरील टोल वसूली बंद पाडली होती. त्यामुळे आमदार व त्यांच्या समर्थकांची साताऱ्यात कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू झाली. त्यांच्याकडून मोठ्या संख्येने युवक गोळा झाले होते. सर्वजण आनेवाडी टोलनाक्याकडे जाणार होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना तिकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर आमदार व त्यांचे समर्थक मोठ्यासंख्येने शासकीय विश्रामगृहावर जमले होते. टोलनाका व्यवस्थापन बदलण्याचे पुढे गेल्यामुळे खासदारांनी टोलनाका व आमदारांनी विश्रागृह सोडले. त्यानंतर दोन्ही गटात सुरूची बंगल्यासमोर राडा झाला. त्या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचे दोन्ही गटावर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या सुचनेनुसार दोन्ही गटांवर आणखी काही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल टोल नाक्यावर जमाव जमवल्याप्रकरणी खासदार उदयनराजे व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल झाले. काल रात्री उशीरा आमदार समर्थकांवर शहर पोलिस ठाण्यातही जमाव व शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला.
उपनिरीक्षक सतीश अस्वर तपास करत आहेत.
उपनिरीक्षक सतीश अस्वर तपास करत आहेत.

0 Comments