औंध:- माण-खटाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शेखरभाऊ गोरे यांचे वर झालेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी व पुढील धोरण ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडी येथे आयोजित मेळाव्यासाठी औंध जिल्हा परिषद गटातून तब्बल १११ वाहनांचे नियोजन झाल्याची माहिती शेखरभाऊ गोरे प्रतिष्टान औंध चे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण यांनी दिली.
शनिवारी दि.२५ रोजी दहिवडी येथे सायंकाळी ४ वा. आयोजित मेळाव्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबाळकर,आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे,युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांचेसह सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.औंध येथे झालेल्या बैठकीत संतोष भोसले, विनोद कदम,गौरीहर देशमुख,संतोष जाधव,ज्ञानेश्वर शिंदे,अजित शिंदे,पोपट येवले,संतोष काळे,रामकाका घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments