Hot Posts

6/recent/ticker-posts

गरवारे वॉल रोप्स चे शैक्षणिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय: विराज शिंदे

वेळे वार्ताहर 
गरवारे वॉल रोप्स चे शैक्षणिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन युवा नेते विराज शिंदे यांनी केले. परखंदी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 

गरवारे वॉल रोप्स च्या सर्वेसर्वा सौ मयुरी गरवारे यांची परखंदी हाईस्कूल परखंदी आणि जि.प.प्राथ.शाळा यांना सदिच्छा भेट .यावेळी त्यांच्या सोबत श्री शिवरायकर साहेब तसेच राजपाठक साहेब तसेच वाई तालुक्याचे झुंजार युवा नेते विराज भैया शिंदे ,पंचायत समिति सदस्या सौ ऋतुजा शिंदे ,जेष्ठ नेते रतनसिंह शिंदे ,गट शिक्षण अधिकारी म्हेत्रे साहेब आणि परखंदी गावचे सरपंच ,उपसरपंच आणि ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते .शाळेचे शिक्षक व विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठया उत्साहात सर्वांचे स्वागत केले.

 सौ मयुरी गरवारे यांच्या हस्ते  जि.प.प्राथ शाळेच्या डिजिटल रूमचा व मुलांना हाथ धुण्याच्या  स्टँड चे  उदघाटन झाले .त्यानंतर त्यांनी परखंदी हाईस्कूल परखंदी ला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम च्या गजरात सर्वांचे स्वागत केले. 

यावेळी युवा नेते विराज भैया शिंदे यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले यावेळी बोलताना ते म्हणाले की गरवारे उद्योग समुहाने जी सामाजिक बांधीलकि जपलि आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार पुढे बोलताना ते म्हणाले अनेक कंपन्या सी.एस.आर.एक्टिविटी अंतर्गत गावाला रस्ते तसेच मंदिरे बांधून देतात पण गरवारे वॉल रोप्स ने शैक्षणिक क्षेत्रात काम करुण पुढची पिढ़ी घडविण्याचे  काम करीत आहेत हे उल्लेखनीय आहे कारन रस्ते ,मंदिर होत राहतात पण मूल शिकलि तर एक आदर्श समाज घडतो तसेच गरवारे कंपनीच्या माध्यमातून परखंदी हाईस्कूल च्या मुलींना सायकल उपलब्ध करुण दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असही ते म्हणाले. 

यावेळी सौ मयुरी गरवारे यांनीही विद्यार्थ्यांशि  संवाद साधला आणि आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की डोंगर कपारित वसलेल्या या गावात एक छान संस्था आणि सुंदर शाळा उभी करुण ती समर्थ पने चालवत आहात त्याबद्दल आबांचे आणि विराज भैय्यांचे खुप कौतुक आणि आभार. 

कार्यक्रमाचा समारोप शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री रतनसिंह शिंदे (आबा)यांनी आभार व्यक्त करुण केला यावेळी त्यानी सांगितले की शिक्षणापासून कुणीही वंचित राहु नये हाच ही शाळा सुरु करण्याचा मुख्य हेतु होता आणि तो आता पूर्ण होत असल्याबद्दल  समाधान वाटत आहे आम्ही आमच्या परीने सगळे देण्याचा प्रयत्न करतो फक्त विद्यार्थ्यांनी आपली आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवावी अशी आशा त्यानी व्यक्त केलि. यावेळी पंचायत समिति सदस्या सौ ऋतुजा शिंदे यांची प्रमुख उपस्थिति होती तसेच गट शिक्षण अधिकारी म्हेत्रे साहेबहि आवर्जून हजर होते.

मुख्याध्यापक यादव सर यानि सूत्रसंचालन केले .यावेळी महादेव जाधव ,गोपाळ महांगड़े ,रमेश जाधव,राजेंद्र गुरव ,महेश महांगड़े,श्रीरंग महांगड़े,पंढरीनाथ वेदपाठक ,प्रमोद महांगड़े ,ज्ञानेश्वर गाढवे ,योगेश शिंदे ,चंद्रकांत महांगड़े ,बळवंत शिंदे ,सूर्यकांत गायकवाड़ आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments