Hot Posts

6/recent/ticker-posts

सुप्रीम कोर्टान प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील दाखल याचिका फेटाळली

विक्रम चोरमले (फलटण) :– प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नव्या नियमांनुसार बदल्यांचे सरकारचे अधिकार शाबूतच राहणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बदल्या होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (सांगली शाखा) आणि सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक या दोन शिक्षक संघटनांच्यावतीने ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.सरकारने संगणकीकृत पद्धतीने बदल्या करण्यासंदर्भात 27 फेब्रुवारी 2017 रोजी एक शासन निर्णय जारी केला होता. उशिरा आलेल्या जीआरबाबत काही शंका असल्यास उच्च न्यायालयात दाद मागावी असे न्यायालयाने स्पष्ट केले.
           बदली हा नोकरीचा अविभाज्य घटक आहे. जिथे बदली करण्यात आली आहे तिथे काम करणे हे गरजेचे आहे, हे राज्य सरकारचे म्हणणे सुप्रीम कोर्टाने मान्य केले व या दोनही याचिका फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती ए. के. गोयल, न्यायमूर्ती जे. जे. भानुमती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरकारच्यावतीने ऍड. निशांत कातनेश्वरकर यांनी तर शिक्षक संघटनांच्या बाजूने एस. बी. तळेकर यांनी बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments