पुसेसावळी:
येथील दत्तचौकात असलेल्या श्रीराम मोबाईल शाॅपी व अन्य तीन पानटपरीची दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून मोबाईल,अॅक्सेसरीज व सिगारेट पाकीट असा सुमारे 10 हजार 500 रुपयांचा माल लंपास केला.याप्रकरणी योगेश विश्वंभर कारंडे यांनी पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,दत्त चौकात सदरची सर्व दुकाने आहेत.गुरुवार रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शाॅपीच्या मागील बाजूच्या पत्र्याची नटबोल्ट काढून मोबाईल व इतर साहित्य लंपास केले आहे.तसेच पानटपरीच्या दुकानातून सिगारेटची पाकीटे लंपास केली आहेत.या घटनेचा पुढील तपास पुसेसावळी पोलीस करत आहेत.

0 Comments