म्हसवड: दिना निमित्त मार्गदर्शन करताना वाघमोडे अॅड घाडगे कुमार सरतापे अंगुली बनसोडे
म्हसवड /सत्य सह्याद्री वृत्तसेवा
स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हक्क कर्तव्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांनी लोकासाठी चालवलेली लोकशाही संविधानाच्या रूपाने देशाला बहाल केलेले भारतीय संविधान लिहिण्यासाठी २ वर्षे ११ महिने १८ दिवसात पूर्ण करून ३९५ कलमे ८ परिशिष्ट संविधानाच्या माध्यमातून घटना लिहणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर सर्व सामान्य माणसा पासुन टाटा बिर्ला पर्यंत एकच मताचा अधिकार देण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून केल्याचे प्रतिपादन आटपाडीचे जेष्ठ विचारवंत प्रा वाघमोडे यानी म्हसवड येथे संविधान दिना निमित्ताने व्यक्त केले
म्हसवड येथील भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास आटपाडीचे विचारवंत अॅड घाडगे व प्रा वाघमोडे माजी नगरसेवक अंगुली बनसोडे माजी नगरसेवक कुमार सरतापे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी वाघमोडे यांनी संविधानात सर्वसामान्य नागरीकापासुन नोकरदार शेतकरी दलितासह सर्व जाती धर्माच्या साठी लिहलेले संविधान आहे नोकरदाराला नोकरीचे आरक्षण १२ तासाची नोकरी ८ तास केले महिलाना नोकरीत आरक्षण प्रस्तुती काळात व गरोदर पणात रजा कामगारांना पी.एफ. सेवानिवृत्त नंतर पेन्शन आदी महत्व पूर्ण निर्णय संविधानात दिले शेतकऱ्यांच्या साठी नदी जोड प्रकल्प हिराकुड व दामोदर धरणाचे प्रकल्प चार वर्षात पूर्ण केले शेतकऱ्यांच्या सवलती संविधानात दिल्या या वेळी विविध कलमाद्वारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी देवू केलेल्या सवलतीची माहिती प्रा. वाघमोडे सर यांनी सांगितली
यावेळी अॅड. घाडगे यांनी संविधानाच्या तरतुदी नाट्यरूपात सांगताना तरूणांना आत्मजागृतीचा संदेश दिला
तर आभाराचे काम अशोक सरतापे गुरूजी यांनी केले प्रथम मान्यवरांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व २६/११ ला शहीद झालेल्या शुर पोलीस अधिकाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली यावेळी लक्ष्मण सरतापे शिवदास सरतापे सचिन सरतापे आदी समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या

0 Comments