Hot Posts

6/recent/ticker-posts

‘सह्याद्रि’चे सभासद व्हीएसआय च्या प्रशिक्षणासाठी रवाना


व्ही.एस.आय. च्या ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षार्थींना पाठवितेवेळी कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, पांडुरंग पाटील (दाजी) व अधिकारी.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु॥ या संस्थेने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्याच्यादृष्टीने, दरवर्षी ऊसशेती ज्ञानयाग कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण देत असते.
यंदाही सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यामार्फत एकूण 21 ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांना ऊस शेती ज्ञानयाग कार्यक्रमासाठी पाठविण्यात आलेले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक 28/11/2017 ते 2/12/2017 असा एकूण पाच दिवसांचा आहे. कारखान्याचेवतीने सदर ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे या संशोधन संस्थेकडे प्रशिक्षण शिबीरासाठी नेणेची -आणणेची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, पांडुरंग ज्ञानदेव पाटील, कार्यकारी संचालक आर.सी.बडगुजर, चीफ अकौन्टंट जी.व्ही.पिसाळ, शेती अधिकारी एम.ए.पाटील, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, उपविकास अधिकारी एस.जी.चव्हाण यांचेसह प्रशिक्षणार्थी सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments