Hot Posts

6/recent/ticker-posts

शेखर गोरेंना मोक्का राजकीय दबावातून नाही: एसपी संदीप पाटील


सातारा
खंडणीचा गुन्हा दाखल असलेले माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यावर राजकीय दबावातून मोक्काची कारवाई केली नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

उंब्रज दरोडाप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. परप्रांतातून गुंतवणूक करून येणारे उद्योग, उद्योजक यांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांची असून वरिष्ठांनाही याबाबत विचारणा केली. त्यामुुळे गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली.  सुरूची प्रकरणी अटकसत्र सुरूच राहणार असल्याचेही सांगितले.

महेश तपासेची मालमत्ता जप्त करणार

सावकारी प्रकरणी मोक्का लावण्यात आलेला साताऱ्यातील फरारी सावकार महेश तपासे याच्यावर आता कायदेशीर फास आवळणार असून लवकरच त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
अनेक गुंडांना मोक्का लावल्याबद्दल पत्रकारांनी पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी येथून पुढे ही मोक्काची कारवाई कडकपणे करण्यात येणार असून कोणी खंडणी मागितली तर त्याचे मागचे रेकार्ड तपासून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments