सत्य सह्याद्री वृत्तसेवा/फलटण
आज पहाटे फलटण शहरातील मारवाड पेठ येथील रहिवासी भागातील नवलभाई मंगल कार्यालयातील परिसरात बिबट्या दिसून आला असल्याची माहीत वन विभागास मिळाली असून या मुळे मारवाडपेठ, तेली गल्ली, शुक्रवार पेठ या भागातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग व पोलीस या बाबत साशंक असून अधिक शोध सुरू असल्याची माहिती वन अधिकारी यांनी दिली आहे.
मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयाच्या जवळच करवा कुटुंबातील लोक आज पहाटे शिर्डीला निघाले असताना मोटारसायकलची लाईट पडल्याने तेथील उभ्या असलेल्या बिबट्याने कार जवळून उडी मारून पुढे शुक्रवार पेठकडे निघून गेला असे प्रत्यक्षदर्शीनी वन विभाग अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन बाणगंगा नदी, शुक्रवार पेठ, मारवाड पेठ या भागात शोध घेतला परंतु त्यांना कोठेही बिबटया दिसला नाही. शोध घेतेवेळी बाणगंगा नदी लगतच्या लोकांकडून माहिती घेतली असता त्यांनीही बिबट्या दिसला नसलेबाबत वन विभागास माहिती दिली. बिबट्या होता की तरस होता या बाबत वनविभागाचे अधिकारी माहिती घेत असून सध्या फलटणमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments