लोणंद
लोणंद फाउंडेशन, लोणंद या सामाजिक संघटनेचे वतीने आज लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब यांचा वाढदिवस केक कापून, पुष्पगुच्छ देऊन व उपस्थित विविध मान्यवरांच्या मनोगत व्यक्त करुन साजरा करण्यात आला. पोलीस बांधवांवरिल कामकाजाचा ताणतणाव व जबाबदारी पार पाडत असतात सण विविध उत्सव साजरा करण्यात साठी मुकावे लागते.
नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखत आनंदोत्सव साजरा केला सण साजरे केले यातच नेहमी आपला सण, उत्सव साजरा झाला अशा मानसिकतेत असणाऱ्या पोलीस बांधवांना ते ही आपल्या सारखे नागरिक आहेत. त्यांना ही सण उत्सव आहेत याचे भाण ठेऊन लोणंद फाउंडेशन, लोणंद या सामाजिक संघटनेचे वतीने दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथजी लांडे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला. अशा उपक्रमाला लोणंद शहर व पंचक्रोशीतील नागरिक वाहवा करित आहेत.
सदर उपक्रम यशस्वीतेसाठी लोणंद फाउंडेशन, लोणंद चे अध्यक्ष दयानंदभाऊ खरात, मुख्य मार्गदर्शक पत्रकार शशिकांत जाधव, पत्रकार रमेश धायगुडे उपाध्यक्षा डॉ. स्वाती शहा मॅडम, निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, खजिनदार सुनील शहा, कायदेशीर सल्लागार अॅड. विलायतभाई उर्फ बबलूभाई मणेर साहेब, सचिव कय्युम मुल्ला, सहसचिव राजाभाऊ खरात, मार्गदर्शक महंमदभाई कच्छी, राजुभाई कुरेशी, बबलूभाई इनामदार, भावेश दोशी, प्राजीत परदेशी,डॉ. जयश्री यादव, अरोरा मॅडम, दिपक बाटे, सुनील यादव, हेमंत पवार आदी पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी, विविध गावचे पोलीस पाटील, नागरिक उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार शशिकांत जाधव यांनी मानले, प्रास्ताविक कय्युम मुल्ला यांनी केले. उपस्थित विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.



0 Comments