फलटण/ सत्य सह्याद्री:
फलटण तहसिल कार्यालयामार्फत दिनांक २९/११/२०१७ रोजी मोठया प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची सुरुवात दिनांक दिनांक २९/११/२०१७ रोजी पहाटे ३:०० वाजता बरड,आंदरुड, जावली,मिरढे या भागातुन सुरू करणेत आली. सदर भागात चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रक्टर व दोन ट्रॉली असे वाहन पकडण्यात आला. वाहन ताब्यात घेवून ते पोलीस स्टेशन फलटण येथे जमा करणेत आले. यानंतर पाडेगाव भागातून वाळू चोरी करणारे लोकाकडून शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असलेबाबत तक्रारी तहसलिदार विजय पाटील यांचेकडे नुकत्याच करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने पाडेगाव भागात निरा नदीस मिळणारा व फलटण व खंडाळा यांचे सिमेवर असणा-या एका ओढयात मोठया प्रमाणार चार मोठे पोकलेनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करून वाळू चोरी सुरू होती. या वेळी चारही पोकलेनचा ताबा वाळू व्यवसायिक घेवून देत नव्हते तरीही महसूल विभागाने विरोध न जुमाना मशिनचा ताबा घेवून पोकलेन मशिन लोणंद पोलीस ठाणे जमा करणेत आले. या मशिन पोलीस स्टेशनला जमा करण्यासाठी खाजगी मोठा ट्रेलर उपलब्ध करुन व सदर मशिन चालवणेसाठी खाजगी चालक उपलब्ध कराव लागला.
यानंतर खडकी मलवडी भागात वाळू उपसा सुरु असुन दोन ट्रक वाळू धुणेसाठी आले आहेत अशी माहिती तहसिलदार यांना मिळाली सदर माहितीची दखल घेवून तहसिलदार यांनी रात्रीचे दहा वाजता खडकी तलावात दोन ट्रक वाळू धुत असताना आढळून आले. यावेळी सापडलेले ट्रक सुध्दा ताब्यात घेवुन ते फलटण येथे पोलीस स्टेशनला जमा करणेत आले. या मोहिमेत एकूण १ कोटी ९१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळूवर कारवाई चालू असताना मा उपविभागीय अधिकरी श्री संतोष जाधव हे वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. पोलीस कर्मचारी यांनी या कारवाईत महसुल यंत्रणेस सहकार्य केलेे. या कारवाईत तहसिलदार विजय पाटील यांचे समवेत मंडल अधिकारी विलास जोशी तरडगाव, मंडल अधिकारी डी.एस पवार फलटण तसेच तलाठी लक्ष्मण अहिवळे,संतोष नाबर, योगेश धेंडे,सचिन जाधव,धायगुडे, शिवाजी अडसुळ,राजेंद्र पंडीत,गोळे,फिरोज अंबेकरी यांचा सहभाग होता.
0 Comments