Hot Posts

6/recent/ticker-posts

शिपायाच्या मृत्यूप्रकरणी डॉ. महादेव कापसेंसह मुख्याध्यापकांवर गुन्हा


पिंपरी
विद्यालयाने बांधलेल्या वर्ग खोल्यांना रंग देण्यासाठी त्यावर पाणी मारत असताना शाळेचे शिपाई बाळु दाजी तरंगे यांना शॉक लागल्याने त्यांचा दि. ९ रोजी मृत्यु झाला, त्यांच्या मृत्युस विद्यालयाचे मुख्याध्यापक व संबधित संस्थाप्रमुख यांनाच जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी मृत तरंगे यांच्या नातेवाईकांनी करीत या दोघांवर जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृत्युदेह न उचलण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलीसांनी सदर घटनास्थळी भेट देत स्थळ पाहणी करीत अखेर या प्रकरणी हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पवार व विद्यालयाचे संस्थापक डॉ. महादेव कापसे यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणाची अधिक माहिती पुढीलप्रमाणे पिंपरी ता. माण येथे हनुमान विद्यालय असुन या विद्यालयाचे संस्थापक डॉ. कापसे तर मुख्याध्यापक म्हणुन अरुण पवार हे काम पाहतात याच शाळेत मयत बाळु दाजी तरंगे वय ४२ हे शिपाई या पदावर काम करीत होते. सदर विद्यालयाने काही वर्ग खोल्याना रंगरंगोटी देण्याचे काम एका ठेकेदाराला दिले असुन रंग देण्यापुर्वी त्या खोल्यांवर पाणी मारण्याची गरज असल्याचे संबधीत ठेकेदाराने मुख्याध्यापकांना सांगितल्याने सदर वर्ग खोल्यांवर पाणी मारण्यासाठी मुख्याध्यापकांना शिपाई तरंगे यांना सांगितले त्यानुसार तरंगे हे संबधीत वर्ग खोल्यांवर ईलेक्ट्रीक मोटारीने दि. ९ रोजी पाणी मारत असताना त्या मोटारीचा जबरदस्त शॉक बसल्याने त्यांचा मृत्यु झाला.

 ही खबर पिंपरी ग्रामस्थ व तरंगे यांच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांनी तात्काळ म्हसवड पोलीस स्टेशनला याबाबतची खबर दिली त्यानंतर म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पिंपरी ग्रामस्थ व तरंगे यांच्या नातेवाईकांनी तरंगे यांच्या मृत्युस विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्थाप्रमुख हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत तरंगे यांचा मृत्युदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण गंभीर बनले होते, याबाबत ग्रामस्थ व नातेवाईक हे फारच आक्रमक झाल्याने माणचे उपसभापती पै. नितीन राजगे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला भेट देत नातेवाईक व ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार पोलीसांनी पिंपरीतील हनुमान विद्यालय येथे जावुन प्रत्यक्ष पाहणी करुन पुढील कारवाई करण्याची विनंती केली, त्यानुसार म्हसवड पोलीसांनी त्याठिकाणी जावुन प्रत्यक्ष पाहणी केली असता संबधीत विद्यालयातील विद्युत मोटारी ला लावण्यात आलेल्या वायरला प्लग व पिन नसल्याचे दिसुन आले तर सदरची वायरही जागोजाग तुटलेली असल्याचे निदर्षनास आले. 

सदर परिसरात विद्युत प्रवाह वाहणाऱ्या मोठ्या वायरचा बंडलही अस्ताव्यस्त पडलेला दिसुन आला असुन याची माहिती असुनही मुख्याध्यापक पवार यांनी बेजबाबदार पणे शिपाई तरंगे यांना पाणी मारण्यासाठी सांगितले त्यामुळेच तरंगे यांच्या मृत्युस विद्यालयाचे मुख्याध्यापक हे जबाबदार आहेत तर संबधीत खराब असलेली वायर बदलावी असे ग्रामस्थांनी वारंवार सांगुन देखील विद्यालयाचे संस्थापक डॉ. कापसे यांनी लक्ष दिले नाही तर एवढी मोठी दुर्घटना घडुनही अद्यापर्यंत या कुटुंबियांची साधी चौकशी केली नसल्याने ते सुध्दा तरंगे यांच्या मृत्युस जबाबदार आहेत. 

याबाबतची फिर्याद मयत तरंगे यांचा भाचा तायाप्पा साहेबराव राजगे यांनी दिल्याने पोलीसांनी भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३० ए नुसार संबधीत मुख्याध्यापक व संस्थाप्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments