सातारा
नारायण राणेंना भाजपने मंत्रीपद दिले तर सेना आमदार पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा आदेश मानून सरकारमधून बाहेर पडणार का? या प्रश्नावर पालकमंत्री विजय शिवतारेंनी आम्ही मातोश्रीवरुन मिळणार्या आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहोत. उद्धवसाहेब देतील तोच आदेश पाळून माझ्यासह सर्वच आमदार निर्णय पाळतील, असे शुक्रवारी सातार्यात सांगितले.
पवार अणि उध्दव ठाकरेंच्या राजकीय भेटीबाबत विचारले असता तो माझा विषय नाही आणि मला माहिती नाही, असे सांगितले. शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष असून. मातोश्रीवरून जो आदेश येईल, त्याचप्रमाणे होईल याबाबत नो डाऊट, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या त्रिवर्षपूर्तीचा आढावा घेतला.

0 Comments