मायणी
४३ वे खटाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ४ ते ६ डिसेंबर अखेर एनकूळ तालुका खटाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, एनकूळ येथे आयोजित केली असल्याची माहिती प्राचार्य एस. डी. बोटे यांनी दिली.
या विज्ञान प्रदर्शनाच्या स्वरूपाची प्राचार्य बोटे .एस.डी. यांनी दिलेली माहिती या प्रमाणे _दिनांक ४ते ६ अखेर सदर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण विभाग जि. प. सातारा ,पंचायत समिती ,खटाव व रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज , एनकूळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे . दिनांक ४ रोजी सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खटाव पं. समितीचे सभापती संदीप मांडवे यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खटाव पंचायत समितीचे उपसभापती कैलास घाडगे हे उपस्थित राहणार आहेत .यावेळी कमलाकर महामुनी, इन्स्पेक्टर, रयत शिक्षण संस्था ,सातारा हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत .यावेळी जि .प .सदस्या सौ. कल्पना मोरे व खटाव पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत . सदर वेळी एच. व्ही .जाधव ,श्रीमती शबनम मुजावर, उप शिक्षणाधिकारी जि .प. सातारा व प्रवीण सुरडकर, गटविकास अधिकारी पं.स.खटाव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे .
मंगळवार दिनांक ५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रश्नमंजूषा ,दुपारी १ ते२ या वेळेत निबंध स्पर्धा व दुपारी ३ ते ५ या वेळेत स्पर्धांचे मूल्यांकन होणार आहे .या दिवशी परिसरातील सर्वांना सदर प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे .
बुधवार दिनांक ६ रोजी सदर विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजीराव सर्वगोड , सभापती ,समाज कल्याण समिती जि.प .सातारा हे राहणार आहेत .या समारंभास देवीदास कुलाळ ,शिक्षणाधिकारी, ( माध्य. ) जि.प. सातारा ,सौ. कल्पना खाडे, सुरेंद्र गुदगे, प्रदीप विधाते, सौ. सुनीता कदम, सौ. सुनीता कचरे हे जि.प. सदस्य , एनकूळच्या सरपंच सौ. सारिका खाडे, उपसरपंच दादासो खाडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .
निबंध स्पर्धेसाठी इ.१ ते इ.४ या गटासाठी माझा आवडता शास्त्रज्ञ, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छतेचे महत्त्व .इ. ५ ते इ.८ गटांसाठी निसर्गाचे वरदान, पर्यावरण रक्षण काळाची गरज, माझा आवडता शास्त्रज्ञ .व इ.९वी व इ.१०वी गटांसाठी चला संशोधनाकडे वळूया ,संशोधन क्षेत्रात महिलांचे योगदान ,मी शास्त्रज्ञ झालो तर, स्वच्छ भारत सुंदर भारत हे विषय ठेवण्यात आले आहेत .सदर विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीततेसाठी लक्ष्मण पिसे, गट शिक्षणाधिकारी पं.स. खटाव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. एस. व्ही. जाधव, विस्तार अधिकारी पं. स. खटाव,महर्षी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस.डी. बोटे व त्यांचा सेवकवर्ग विशेष प्रयत्न करीत आहेत.

0 Comments