वरकुटे-म्हसवड / सत्य सह्याद्री वृत्तसेवा
माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अनुराधा देशमुख (मार्गदर्शक ड्रीम सोशल फौंडेशन), हर्षदा देशमुख-जाधव (अध्यक्षा- ड्रीम सोशल फौंडेशन) या देशमुख कुटुंबीयांनी मौजे बिदाल ता.माण येथील प्रगतशील शेतकरी संजय गांधी यांच्या डाळिंब बागेस सदिच्छा भेट दिली.
दुष्काळी माण तालुक्यातील एक शेतकरी स्वतः आपल्या गावासमवेत जलसंधारणाचे काम केले व या केलेल्या कामाचा निकाल स्वतःच्याच बागेत 350 ते 400 मे. टन याच्या माध्यमातून 1.50 ते 1.75 कोटी रु. इतके डाळिंबाचे उत्पन्न मिळावे ही अपेक्षा शेखर गांधी यांची आहे. मा.देशमुख यांनी गांधी कुटुंबियांचे डाळिंब बागचे नियोजन पाहुन समाधान व्यक्त केले. ही गोष्ट माण तालुक्यासाठी अभिमानाची आहे. त्याच बरोबर गट शेतीच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येऊन शेती व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने करून उत्पन्न वाढवावे व शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीकरता कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात या विषयावरती चर्चा केली.
यावेळी नगरसेवक अजित पवार ,राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, संजय गांधी इत्यादी उपस्थित होते.

0 Comments