Hot Posts

6/recent/ticker-posts

शरयू ऍग्रो चे आतापर्यंत २ लाख ४१ हजार मे. टन ऊसाचे गाळप


फलटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
कापशी ता. फलटण येथील शरयू ऍग्रो साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात आतापर्यंत २ लाख ४१ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन २ लाख ६२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.८८ % आहे.
पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ८९ हजार मे. टन ऊसाला प्रतिटन २६५० रुपयाप्रमाणे २३ कोटी ५८ लाख रुपयांचे पेमेंट संबधीत ऊस उत्पादक शेतकऱ्याचे बँक खात्यावर दि. २७ नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आले असून या कारखान्याने ऊसाचे विक्रमी गाळप करुन पेमेंट वाटपातही आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या हप्त्यानंतर प्रथेप्रमाणे बैल पोळा आणि दिवाळी सणासाठी आणखी दोन हप्त्यात ऊस उत्पादकांना समाधानकारक आणि उच्चांकी ऊस दर देण्याचा मनोदय व्यक्त करीत शेतकरयांनी यावर्षीच्या हंगामात आपला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी शरयुलाच द्यावा असे आवाहन शरयूचे चेअरमन श्रीनिवास तथा बापूसाहेब पवार यांनी केले आहे.
शरयुने ऊस दराची कोंडी फोडून  २६५० रुपये प्रतिटनाप्रमाणे पहिल्या हप्त्याचे पेमेंट सर्वप्रथम करुन आघाडी घेतली, त्याचप्रमाणे तोडणी वाहतूक बिल व टोळी भाडे अदा केले आहे. वेळेवर आणि रास्त दरात ऊस पेमेंट मिळत असल्याने शेतकरी उत्साहाने शरयूकडे गाळपासाठी ऊस पाठवीत असल्याने उद्दिष्टाप्रमाणे ८ लाख मे. टन ऊस गाळप होण्यात कसलीही अडचण नसल्याचे चेअरमन श्रीनिवास तथा बापूसाहेब पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments