Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलीस महानिरीक्षकांच्या नावाने बोगस पत्र, पानवण च्या युवकावर गुन्हा


म्हसवड/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
दिल्ली येथिल एनआयए या अधिकाऱ्याने जर आपणाला जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकाऱ्याच्या नावे पत्र दिले तर आपणाला परदेशात  ( कँनडा ) येथे नोकरी भेटेल व त्याठिकाणी विनापरवाना जाण्याची संधी मिळेल या समजुतीतुन पानवण ता. माण येथिल सागर आबाजी शिंदे या युवकाने म्हसवड येथिल एका संगणक सेंटरवरुन विषेश पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर यांच्या कार्यालयात  वरीष्ठअधिकाऱ्याच्या नावे फँक्स करुन फसवणुक केली असल्याची तक्रार म्हसवड पोलीस स्टेशनचे गोपनिय प्रकाश तानाजी इंदलकर यांनी म्हसवड पोलीसात दाखल केली असुन या तक्रारीवरुन पोलीसांनी संबधीत फँक्स मशीन व संगणक सेंटरमधील संगणक ताब्यात घेतला आहे. दरम्यान अशा प्रकारचा आगळा वेगळा गुन्हा म्हसवड पोलीसात दाखल झाल्याने सर्वजण चक्रावुन गेले आहेत. 

याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी पानवण ता. माण ( पागंळेमळा ) येथिल सागर शिंदे या युवकाने परदेशात नोकरी मिळवण्यासाठी विषेश पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर यांच्या नावे बनावट पत्र येथिल संगणक सेंटरवरुन बनवुन घेवुन ते पत्र नवी दिल्ली येथिल एन. एन. डी. दुबे के सी डेप्युटी इन्सपेक्टर जनरल  ( ADM) एन. आय. ए. यांच्या कार्यालयात पाठवुन त्याची प्रत विषेश पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर यांच्या कार्यालयात पाठवली आहे, अशा प्रकारचे पत्र अधिकाऱ्यांना पाठवुन त्यांची फसवणुक केली सदर पत्रावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही नसल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचे पत्र संगणक सेंटरचे बनसोडे सर यांच्या सहकार्याने तयार केले असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments