मायणी :-स्वप्नील कांबळे
'अंगणवाडी'बालवाडी ' या बल्यावस्थ्यातील शिक्षणाचा श्रीगणेशा प्रत्येक विद्यार्थी करीत असतो ,आई वडिलां नंतरची अक्षरांची ओळख करून देणारी,आणि छान छान गोष्टी सांगणारी अंगणवाडी सेविका अर्थात बाई असतात. या अंगणवाडी सेविका बालचमुंच्या आयुष्यातील शिक्षणाचा पाया मन लावून घालतात परंतु स्वतःच्या वृद्धपाकाळाची तजवीज मिळणाऱ्या मानधनात त्यांना करता येत नाही . सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या पडणाऱ्या शब्दांना झेलणाऱ्या व आजच्या काळात वशिलेबाजी ची पुरवणी जोडल्याशिवाय प्रशासकीय कार्यालयातील प्रकरणे काही पुढं जात नाहीत अश्यात वृद्धापकाळाने असहायय झालेल्या अंगणवाडी सेविकेची दखल कोण घेणार ?
ही व्यथा आहे, मायणी ता खटाव येथील सौ सुशीला विजयकुमार गुरव या एक सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका यांची. सौ गुरव यांना गेल्या काही वर्षात मधुमेह,रक्त दाब या आजारांनी घेरले आहे. यातच नशिबाचा खेळ म्हणजे पैशाअभावी वेळीच उपचार न झाल्याने डोळ्याला आलेले अंधत्व आणि यामुळे त्यांना १६ /८/२०१६ रोजी अंगणवाडी सेविका या कामातून अवेळीच सेवानिवृत्ती घ्यावी लागली. आता डोळ्याचे अंधत्व,व इतर आरोग्य समस्यांवर औषधोपचार करण्यासाठी सौ सुशीला गुरव या अंगणवाडी सेविकांसाठी शासनाने मान्य केलेली एक लाख रुपये या एल आय सी अंतर्गत मिळणाऱ्या रकमेची मदत मिळण्याची प्रतिक्षा करीत आहेत. सेवा निवृत्त झाल्यानंतर सौ गुरव यांनी दोन महिन्यांनी म्हणजेच दि १३/१०/२०१६ रोजी संबंधित एल आय सी ची रक्कम मिळावी यासाठीचा प्रस्ताव गटविकास अधिकारी ,पंचायत समिती खटाव यांना समक्ष जाऊन दिला. परंतु आज अखेर वर्ष होऊन देखील कोणताही ठोस निर्णय सौ गुरव यांच्या पर्यंत आला नाही .
या संदर्भांत सौ सुशील विजयकुमार गुरव यांनी चौकशी केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.सातारा ,एल आय सी विमा कार्यालय सातारा, एल आय सी कार्यालय पुणे, आयुक्त कार्यालय एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन मुंबई या प्रमाणे आपला प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे असे उत्तर मिळाले आहे . एक वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर २०१६ रोजी पंचायत समिती खटाव , वडूज येथेसादर केलेला प्रस्ताव गत नोव्हेंबर २०१७ या महिन्यात रायगड भवन मुंबई पाठवल्याचे पत्र सातारा जिल्हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना ,जिल्हा कक्ष या कार्यालयातून सौ सुशीला गुरव याना देण्यात आले आहे .परंतु मुंबई कार्यालयातून पुढे प्रस्तावाचे काय झाले याची माहिती कोणीही देण्यास तयार नाहीत. मात्र जिल्हा परिषदेतून प्रस्ताव मुंबई कार्यालयात जाण्यासाठी एकवर्षाचा कालावधी घेणारे प्रशासन प्रस्ताव मंजूर होऊन ,मिळणारी मंजूर रक्कम सौ सुशीला विजयकुमार गुरव यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अजून किती वर्षे ,महिने घालवणार हा प्रश्न आहे .
दृष्टीस आलेले अंधत्व,अन्य आरोग्यसमस्यांनी खंगत चाललेल्या सौ सुशीला विजयकुमार गुरव यांच्या प्रस्तावा संबंधी प्रत्येक कार्यालयाने आपली जबाबदारी झटकल्याने सौ गुरव हतबल झाल्याअसून पैशाविना न होणाऱ्या उपचारामुळे या वृद्ध सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेची दखल शासन घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे खरे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्दैव
अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्न अद्यापही धूळ खात पडलेले दिसतात परंतु विविध आरोग्य समस्यांनी ग्रासलेल्या सौ सुशीला गुरव यांनी आपल्या प्रस्तावाची दखल शासन घेतली नाही तर मी उपोषणास बसणार असल्याचे म्हंटले आहे परंतु छोट्या लहानग्यांना मोठे झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्ने दाखवणाऱ्या या अंगणवाडी बाईंना आपल्या हक्कसाठी वृद्धपकाळात उपोषणास बसावे लागते आहे हे खरे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्दैव म्हणावे लागले.
तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार
"आयुष्यभर केलेल्या सेवेनंतर मी आरोग्य समस्येमुळे दिलेल्या राजीनाम्यानंतर माझ्या डोळ्यांच्या व अन्य उपचारांसाठी मी शासनाने मंजूर केलेल्या एल आय सी चे एक लाख रुपयेची मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे परंतु अद्याप कोणतीही मदत मला मिळाली नाही. अत्यंत हलाखीचे जीवन आज मी जगत असून उपचार न होता मला मरण आले तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल
-सौ सुशीला विजयकुमार गुरव

0 Comments