विडणी/सतिश कर्वे फलटण तालुक्यात ग्रामीण भागात काही रुग्णांना डेंगूचे लक्षणेचा अपवाद वगळता पेशंटचा अज्ञान पणाचा फायदा घेत डेंगूच्या नावाखाली पँथालॉजी वाल्याशी हातमिळवणी करुन विविध रक्ताच्या तपासणी करणेस पेशंटला भाग पाडून डॉक्टरला हवे तसे रिपोर्ट बनवून पँथालॉजी वाल्याकडून कमिशन शिवाय पेशंट अँडमिट केल्यावर त्याचा वेगळाच चार्ज असा एकदंर पेशंटला बळीचा बकरा बनवून त्याला लुटण्याचा गोरख धंदा सध्या ग्रामीण भागात डॉक्टरा कडून जोरात सुरु असल्याची चर्चा सध्या नागरिका मधून असू आहे. शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरीत भरारी पथकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दवाखान्यास अचानक भेटी देऊन तपासणी करुन पेशंटची होणारी आर्थिक लुट थांबवून दोषी डॉक्टर वर कारवाई करावी अशी मागणी नागरिका मधून होत आहे.
फलटण तालुक्यात सध्या वातावरण बदलामुळे सर्दी,खोकला,थंडी,तापचे रुग्णाच्या संखेत वाढ होत असताना दिसत असून अनेक ठिकाणी दवाखाने फुल भरले आहेत पेशंट आपल्यास ताबडतोब गुण मिळावा म्हणून आपल्या विश्वासू डॉक्टरकडे तपासणी साठी जात असतो. वैद्यकीय व्यवसायात काही विश्वासू डॉक्टर आहेत पण काही जण पेशंटला बळीचा बकरा बनवून त्याच्या खिशाला काञी लावण्याचा प्रकार सुरु आहे.
हल्ली कमी कष्टात जास्त पैसा कमविनेच फँड आजकाल सर्वञ सुरु आहे. याला वैद्यकिय क्षेत्र देखील मागे नाही पूर्वी डॉक्टरला साक्षात देव मानले जायचे परंतु टक्केवारीच्या (कट प्रक्टिस) फेऱ्यात वैद्यकीय व्यवसाय अडकल्याने आजकाल पेशंटने कुठल्या डॉक्टर वर विश्वास ठेवायचा अवघड होऊन बसले आहे.
थंडी,ताप,सर्दी,खोकला झालेले पेशंट आले की त्याला विनाकारण विविध रक्त लघवी तपासणी चाचणी करायला भाग पाडले जाते. पँथालॉजी वाला येऊन पेशंटचे रक्त लघवी घेऊन रिपोर्ट आणून देतो. रिपोर्ट इंग्रजीत असल्याने शिवाय पँथालॉजी वाला व डॉक्टरचे रिपोर्ट ठरल्या प्रमाणे असतो संबंधित डॉक्टर पेशंटला रिपोर्ट बाबत भिती घालून त्यास अँडमिट होण्यास भाग पाडले जाते त्याच्याकडून भरमसाठ बिल उकळले जाते .
थंडी तापाची अनेक लक्षणे असू शकतात शिवाय रक्तातील प्लेट लेट देखील अनेक कारणांनी कमी जास्त होऊ शकतात परंतु पेशंटचा अज्ञान पणाचा फायदा घेऊन त्यास डेंगूची लागण झाल्याचे सांगून त्यास अँडमिट करणेस भाग पाडून त्याच्या कडून बिलापोटी भरमसाठ रक्कम घेऊन आपले उखळ पांढरे करुन घेतले जाते. तसेच पेशंटला सलाईन लाऊन गरज नसताना अँटिबायोटिक हाय्यर इंजेक्शन गोळ्या देऊन त्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालतो. या हाय्यर डोसमुळे पेशंटला रिअँक्शन आल्यास त्याचा जीव जाऊ शकतो हे सर्व माहित असताना डॉक्टर पेशंटला अशाप्रकारे औषोधोपचार सुरु असतो.
ग्रामीण भागात खाजगी थंडी तापाच्या डॉक्टर कडून पेशंटच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन त्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याने शासकीय वैद्यकीय अधिकारीनी भरारी पथक नेमून दवाखाने अचानक भेटी देऊन तपासणी करावी व दोषी वर त्वरीत कारवाई करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे.
डेंगू आजार झाला हे अधिकृत मान्यताप्राप्त पँथालॉजी मधून रक्ताची तपासणी एलिसा टेस्ट केल्यानंतरच समजते अन्य तपासणीची गरज नसते. तसेच डेंगू या आजाराला बरा करणे करिता उपचार नाहीत पेशंटने आराम करुन स्वःताची काळजी घेणे महत्त्वाचे असते. तालुक्यात अनेक पँथालॉजी लँब अनधिकृत आहेत पण यास टक्केवारी मुळे संबंधित डॉक्टरचे पाठबळ आहे.आपला बोगसपणा समजू नये म्हणून पँथालॉजीचा रिपोर्ट पेशंटला न देता स्वःता जवळ ठेवून घेतात.
ग्रामीण भागात खाजगी थंडी तापाचा डॉक्टर त्यास पेशंट अँडमिट करु शकत नाहीत असे महाभाग पेशंटला हाय्यर अँटिबायोटिक गोळ्या इंजेक्शन दिले जाते यामुळे पेशंटला आराम लगेच मिळतो पण याचे दुष्परिणाम खुप आहेत या औषधा मध्ये स्टिरोईड सारखे घातक औषधे असते या औषधाच्या वारंवार वापरामुळे पेशंटचे अवयव बाद होतात तसेच अँटिबायोटिक हाय्यर डोस हे फक्त एम.बी.बी.एस.सारखे तज्ञ डॉक्टरच पेशंटला देऊ शकतात.अशा डॉक्टरची प्रिप्रेशन मेडीकल वाल्याकडे पेशंट घेऊन गेला तरच त्यास औषधे देण्यास परवानगी असते.परंतु असे घडत नाही पैशाच्या लोभा पोटी खाजगी डॉक्टर सांगेल ती औषधे उपलब्ध करुन देतो असतो.
डेंगू आजार असलेले पेशंट उपचारासाठी खाजगी दवाखान्यात असता संबंधित डॉक्टरने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना कळविणे नियमानुसार बंधनकारक असते परंतु खाजगी दवाखान्यात आलेल्या पेशंटची पँथालॉजी कडून रक्त लघवी तपासणी केल्यावर त्यास डेंगू झाल्याचे सांगितले जाते परंतु याचा रिपोर्ट शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना दिला जात नाही व तसे कळविले जात नाही यामुळे संशयास्पद भूमिका तयार होऊन या मागचे गौडबंगाल आणखी काय आहे हे समजत नाही
खाजगी डॉक्टरांनी दवाखान्यात पेशंटला दिसेल असे दर्शनी बाजुस डेंगू तपासणी फी सहाशे रुपये आकारावी असे शासकीय परिपञक काढले असून याची सर्वांनी अंमलबजावणी करावी तसेच पेशी कमी झाल्या डेंगू झाला असे पेशंटला सांगून समाजात भिती पसरवू नये योग्य निदान झाल्यावरच तसे सांगावे समाजात अफवा पसरवून भिती निर्माण केल्यास संबंधित डॉक्टरला नोटीस पाठवून कारवाई केली जाईल असे जिल्हा हिवाताप वैद्यकिय अधिकारी डॉ.अविनाश पाटील यांनी सांगितले .
0 Comments