Hot Posts

6/recent/ticker-posts

महावितरणकडून वीज बिल दुरुस्तीबाबत शिबीर आयोजित करण्यास टाळाटाळ


फलटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
महावितरण वाणिज्य मुख्य अभियंता यांनी दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ रोजी वीज बिल दुरुस्तीबाबत परिपत्रक काढले आहे. यापुर्वी कृषीपंपाच्या वीज देयकाच्या दुरुस्तीबाबत महावितरणकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने वीज बिलाच्या दुरुस्तीसाठी दिनांक १/१२/२०१७ ते ३१/१२/२०१७ या की कालावधीत फिडरनिहाय शिबिराचे आयोजन करून या शिबिरात प्राप्त वीज बिल तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी व वीज बिलाच्या तक्रारी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रकाशगड मुबंई या मुख्य कार्यालयाने दिल्या आहेत. परंतु आजअखेर अधीक्षक अभियंता कार्यालय सातारा, जिल्ह्यातील सर्व महावितरण विभागीय कार्यालय, महावितरण उपविभागीय कार्यालय यांनी आजअखेर कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही अथवा याबाबत कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. परिपत्रक काढूनही त्यास केराची टोपली दाखवण्यात आली असून दैनिक सत्य सह्याद्रीने याबाबत शेतकऱ्यांना जागृत करायचे ठरविले असून त्यामुळे ही बातमी प्रकाशित केली आहे.

 काही महिन्यांपूर्वी दिवाकर विश्वनाथ उरणे लातूर परिमंडळ महावितरण कार्यालयात वाणिज्य शाखा ज्युनिअर मॅनेजर पदावरती काम करत असताना २०१२ मध्ये महावितरणने एम.एल.आर.सी ला महावितरणचा तोटा कमी आहे असे दाखवण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालय यांना एक उद्दिष्ट देण्यात आले यात वरिष्ट कार्यालयाने तोंडी आदेश देत वाढीव बिल तयार करण्यात आली. पहिल्या टप्यात पाणी पुरवठा व रोड लाईट(दिवा बत्ती) यांची वाढीव बिल देण्यात आली व बिल येणे बाकीची आकडेवारी वाढवण्यात आली. यानंतर दुसऱ्या टप्यात शेती पंपाची वाढीव वीज बिले पाठवण्यात आली. शेती पंपाच्या वीज बिलात वाढ करण्यासाठी महावितरणने ज्या शेतकऱ्यांचे ३ एच.पी अश्वशक्ती वीज कनेक्शन आहे अशा २.५४.६३७ शेतकऱ्यांना ५ एच.पी चे तर ५ एच.पी अश्वशक्ती वीज कनेक्शन आहे अशा १.३८.४७३ शेतकऱ्यांना ७. ५ एच.पी चे तर ७.५ एच.पी अश्वशक्ती वीज कनेक्शन आहे अशा १२.६०४ शेतकऱ्यांना १० एच.पी चे वाढीव अश्वशक्तीची वीज बिल पाठवण्यात आली.  या वाढीव बिलातून महावितरणने ४.०५.७१४ शेतकऱ्यांना बोगस बिले पाठवण्यात आली. या अशा बोगस बिलामधून लाखो शेतकऱ्याची कोट्यवधींची लूट झाली असून लूट आजही चालू आहे. अनेक शेतकरी त्यांना आलेलं बिल खात्री करून वीज भरणा करणं गरजेच असताना खात्री न करता आजही बिल भरत असून यापूर्वी बिल भरली आहेत. त्यामुळे वीज न वापरता हजारो कोटींची लूट आजअखेर होत आहे. त्यात आजून भर म्हणून ज्या शेती पंपाना मीटर बसविले आहेत अशा मीटरचे रिडिंग न घेता वापर नसताना खोटी रिडिंग टाकली जातात व वीज बिल आकडा फुगवून वीज बिल वसुली केली जाते.

शेतकऱ्यांनी आता जागे होऊन वीज बिलाच्या दुरुस्तीसाठी दिनांक १/१२/२०१७ ते ३१/१२/२०१७ या काळात शेत पंपाच्या वीज बिलाची खात्री करावी. यामध्ये वीज कनेक्शन घेताना किती अश्वशक्ती (एच.पी) लोड होता? आज रोजी किती अश्वशक्ती (एच.पी) लोड आहे? कधी पासून अश्वशक्ती (एच.पी) लोड वाढवण्यात आला? आज रोजी वीज मीटर मध्ये किती रिडिंग आहे? वीज बिलात किती रिडिंग आहे? याची खात्री करणे गरजेचे आहे. जर अश्वशक्ती (एच.पी) लोड व रीडिंगमध्ये बदल असल्यास लेखी स्वरूपात अर्ज दाखल करावा व व्याजासह वीज बिल दुरुस्ती करून पैसे परत मिळणेबाबत शिबिरात तक्रार दाखल करावी तसेच तक्रार अर्जाची पोहच प्रत घ्यावी. शेतकरी जागृत झाला तरच होणारी लूट थांबणार असून महावितरण कार्यालयाने शिबीर आयोजित केले नाही तरी स्वतःहून महावितरण कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करावेत.

Post a Comment

0 Comments