म्हसवड/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
लहानवयातच मुलांचे प्रमाणापेक्षा वाढत असलेले जादा वजन हे पालकांच्या चिंतेचा विषय बनला असतानाच फ्यूचर फस्ट फिटनेस अॅकाडमीचे संस्थापक अध्यक्ष अभय धोंडीराम वाघमारे यांने तरूण वयात काळाची गरज ओळखून एक पाऊल पुढे टाकत लहान मुलांसाठी अॅकाडमी सुरू केली व आज त्याचा मुलांचे वजनं कमी झाल्याचेदिसून येत असल्याने या अॅकाडमीचे सामाजिक बांधीलकीतून सुरू असलेले काम मुलांसाठी वरदान ठरत असून मुलांनी स्मार्ट फोन मध्ये मैदानी खेळ खेळण्या पेक्षा मैदानावर जाऊन खेळावेत असे प्रतिपादन माजी मंत्री लोकनेते गणेशजी नाईक यांनी काढले.
फ्यूचर फस्ट अॅकाडमीच्या तृत्तीय वर्धापन दिना निम्मित कोपरखैरणे येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून नाईक बोलत होते.यावेळी माजी.खा.डाॅ.संजीव नाईक आय.पी.एल.क्रिकेटर प्रविण तांबे अभिनेत्री हेमांगी राव विनोद राव नगरसेवक शशीकांत राऊत प्रसिध्द कॅन्सर तंज्ञ डाॅ.शिशिर शेठ्ठी अॅकाडमीचे संस्थापक अध्यक्ष अभय वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नाईक म्हणाले 21व्या शतका मध्ये 5ते10वर्षे वयातील लहान मुलांचे वाढत असलेले जादा वजन हा चिंतेचा विषय बनला आहे.यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.लहान मुले मैदानावर खेळण्या ऐवजी स्मार्ट फोनवर क्रिकेट फुटबाॅल व्हाॅलीबाॅल खेळत आहेत.ही बाब गंभीर बनत चालली असताना युवा क्रिकेटर अभय वाघमारे यांनी लहान मुलांचे वजन कमी करण्यासाठी फ्युचर फस्ट फिटनेस अॅकाडमीची स्थापना करून तृतीय वर्धापनदिन साजरा होत असताना ही अॅकाडमी मुलांसाठी वरदान ठरली आहे.आज अनेक मुले येथील धडे घेऊन वाढलेले वजन कमी करण्यात यशस्वी झाली असल्याने आज पालक वर्गाचा ओढा या अॅकाडमी कडे वाढत चालला आहे.याचे सगळे श्रेय अभय वाघमारे याचे असल्याचे सांगून नाईक पुढे म्हणाले मी ऐका शेतकर्याचा मुलगा आहे.मी माझ्या तरूण वयापासून क्रिकेट खेळत असून हा खेळ माझा आवडता खेळ असून आजही मी 67व्या वर्षी हा खेळ वेळ मिळेल त्या वेळी खेळत असतो.त्याकाळी जर अभय वाघमारे प्रविण तांबे सारखे फिटनेस ट्रेनर लाभले नाहीत.
मी माझ्या राजकीय जीवनात सन2014च्या निवडणूकी मध्ये विक्रमी मतानी विजयी होण्याचा रेकाॅर्ड निर्माण केला आहे तर माण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे यांनी दोन वेळा अपक्ष निवडूण येण्याचा विक्ररम केला होता.वाघमारे हे सभागृहा मध्ये दुष्काळी भागातील पाणी प्रश्नासाठी नेहमी पोटतिडकीने आग्रही भुमिका मांडत होते.राजकारणा पेक्षा समाजकारणाची त्यांना अधिक आवड होती.आज अभय वाघमारे हा त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक बांधीलकी ठेऊन निस्वार्थीपणे काम करत आहे.निश्चितपणे त्यांचे भविष्य उज्ववल आहे.अफाट कष्ट करण्याची जिद्द त्याच्यात आहे.असे सांगून नाईक पुढे म्हणाले मुलांनी लहाण वयात ध्येय निश्चित करून आई-वडिलांसह थोरा मोठ्याचा आशिर्वाद घेऊन मार्गक्रमण केल्यास यश हमकास येते मात्र यासाठी खडतर मेहनत अथक परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही स्मार्ट फोनवर खेळ खेळण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळ खेळावेत अभय वाघमारे सारखा परफेक्ट ट्रेनर आपल्याला लाभला आहे.त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही नाईक यांनी शेवटी केले.
प्रास्ताविक भाषणा मध्ये अभय वाघमारे यांनी भविष्यात सन 2019मध्ये गणेश नाईक 'दादा'नी क्रिडाच्या क्षेत्राच्या धोरणात बदल करून क्रिडा क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी अॅकाडमीच्या वर्धापन दिना निम्मित वृक्ष वाटप करण्यात आले.कार्यक्रमास सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments