Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरूकुल स्कूलचा अनोखा उपक्रम ‘एक ओंजळ धान्याची...’


सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
शाहूनगर येथील इंग्रजी माध्यम गुरूकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वप्रेरणेने शाळेत एक ओंजळ धान्याची उपक्रम सुरू केला आहे.

आज आपल्या देशात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या विचारांनी प्रेरित होवून इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम छोटया प्रमाणात शाळेत सुरू केला व काही दिवसात शाळेतील इतर सर्व विद्यार्थ्यांंनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी विविध प्रकारचे उपक्रम गुरूकुलच्या माध्यमातून राबविले जातात. यामध्ये वीज बचत , पाणी बचत, स्वच्छ भारत अभियान, अन्न बचत इ. उपक्रमांचा समावेश आहे.

गुरूकुलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले की, या  एक ओंजळ धान्याची या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी जी सामाजिक बांधिलकी जपली आहे ती उल्लेखनीय असून हेच आम्हाला अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जना बरोबरच जीवनमूल्ये देणे ही शाळेची नैतिक जबाबदारी आहे. एक ओंजळ धान्याची या उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेले धान्य हे गरजू शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देण्याची व्यवस्था स्कूलच्या माध्यमातून करण्यात येईल.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका   शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी  विश्‍वनाथ फरांदे, सेकंडरी विभागाच्या इनचार्ज सोनाली तांबोळी, पूर्व प्राथमिक विभागाच्या इनचार्ज अनुराधा कदम, सुपरवायझर मोहन बेदरकर तसेच सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहन देत आहेत.

Post a Comment

0 Comments