खटाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर व त्यांचे कर्मचारी पथकाने शुक्रवार पहाटे मांडवे येथील ५, वाकेश्वर २, पेडगांव १ व सातेवाडी येथील ४ अशा एकुण १२ जणांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ऊघड्यावर शौचाला गेलेल्या अवस्थेत पकडले.
वडूज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तराना प्रत्येकी ३०० रू.दंड ठोठावला.या साठी उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत काळे,वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या "गुड मॉर्निंग"पथकामध्ये आप्पा गौंड,दिपसागर पोतदार,एल.जे.चव्हाण,अमोल गोरे, राजाराम जाधव,सुनिल राजगुरु,सचीन सस्ते व पोलीस कर्मचारी भोसले यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली.हे "गुड मॉर्निंग"पथक यापुढेही धड़क कारवाई करत राहणार असल्याची माहिती सुरडकर यांनी दिली.

0 Comments