Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण एसटी महामंडळ यांच्या विरोधात पत्रकार उपोषणास बसणार

फलटण/ विक्रम चोरमले
फलटण एस टी महामंडळ फलटण डेपोच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात फलटण तालुक्यातील सर्व शहर व तालुका पत्रकार यांच्या वतीने दिनांक १६/१२/२०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता एसटी महामंडळ फलटण येथे उपोषणास बसणार आहेत.

      फलटण एसटी महामंडळ यांच्या विविध तक्रारी  वेळेत एसटी बस न सुटणे, प्रवासी जेष्ठ नागरिक विद्यार्धी यांच्याशी उद्धटपणे बोलणे, धोकादायक एसटी बसेस मधून प्रवासी वाहतूक करणे, एसटी बसेसची साफसफाई न करणे, एसटी पास देणेसाठी दिरंगाई करणे या व ईतर सर्व एसटी समस्येबाबत अनेक वेळा फलटण तालुक्यातील जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, विविध पक्ष व संघटना यांनी यापूर्वी निवेदन व आंदोलन करूनही कोणतीच योग्य कारवाई न झालेमुळे जेष्ठ पत्रकार मा. अरविद मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील सर्व शहर व तालुक्यातील पत्रकार उपोषणास बसणार आहेत. फलटण एसटी महामंडळाच्या या अनागोंदी कारभाराच्या तक्रारी सातारा विभागीय कार्यालयाकडे दाखल करूनही वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता दुर्लक्ष करत आहेत यांची दखल पत्रकार यांनी घेत आज मा. विजय पाटील, तहसीलदार फलटण, मा. रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments