सातारा
सातारा विकास आघाडीचे समिकरण म्हणजे सत्तेचा उन्माद व हुकूमशाहीने राजकारण करणे हेच आहे. साविआची खासीअत म्हणजे धमक्या देणे, सत्तेचा उन्माद असणे हे आपल्या आघाडीला शोभून दिसते. सभेत विरोधकांचा माईक काढून घेणे, त्यांना बोलून न देणे, अंगावर धावून जाणे, हे सर्व आपणास शोभून दिसते. दुसर्याच्या सांगण्यावरुन पत्रके काढण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपला किमती वेळ जनतेच्या कल्याणाकरता वापरा, असा सल्ला देतानाचा पालिका बरखास्त करून दाखवा, असे म्हणणे हाच सत्तेचा उन्माद आहे, असे प्रत्त्युत्तर भाजपाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी पत्रकाद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले यांना दिले.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ये पब्लिक है सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब पेहचान ती है ये पब्लिक है जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. ते मूग गिळून गप्प बसण्यासाठी नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी. सातार्याच्या इतिहासात प्रथमच भाजपाचे स्वबळावर 6 नगरसेवक निवडून आले. साविआची जर एवढीच कार्यक्षम विकासात्मक काम करणारी असती तर 40 -0 ही घोषणा काठावर येवून का थांबली. याचे आत्मपरिक्षण करा.
पालकमंत्र्यांनी 1 जुलैला स्वतः पालिकेत येवून जो आढावा घेतला. त्यामध्ये किती खुष होते. हे त्यांच्या बोलण्यात समजले. पालिकेत एसीत निवांत बसता व जाता. त्यामुळे तुम्हाला आमचे प्रयत्न 5 वर्षात कधी दिसतील असे वाटत नाही. आपण आजपर्यंत केलेला एककल्ली कारभार हा आघाडीची वैचारिक व नैतिक दिवाळखोरीच दर्शवतो. मुळात आम्ही कधीच सत्तेला हपापलेलो नाही. जनतेचा कौल स्वीकारण्याची व त्याला मान देण्याची परंपरा आमच्याकडे आहे. धमक्या देणे, सत्तेचा उन्माद असणे हे सर्व आपल्या आघाडीला शोभून दिसते. हे जनतेने 2 नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत पाहिले आहे. विरोधकांचा माईक काढून घेणे, अंगावर धावून जाणे हे सर्व आपणास शोभून दिसते. हाच तो सातारकरांनी अनुभवलेला सत्तेचा उन्माद. आपला अमुल्य वेळ सातारकरांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे खर्ची करावा. दुसर्याच्या सांगण्यावरुन पत्रके काढण्यात तो वाया घालवू नका, असे पत्रकात नमूद आहे

0 Comments