पाटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
पाटण नगरपंचायत मध्ये नोकर भरतीमध्ये सावळागोंधळ झाला आहे. पेपरला जाहिरात न देता, कोणाचीहि मुलाखत न घेता, शहरामध्ये अनेक युवक पात्र असताना ,काही नगरसेवकांनी आपल्या बगलबच्चेंची कंत्राटी नेमणूक केली आहे. यामुळे नगरसेवकामध्ये नाराजी वाढली आहे. या निर्णयाला मुख्याधिकारी यांची मुकसंमती असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सूरु आहे.
काही कंत्राटी कर्मचारयांची गरज नसताना त्यांची नेमणूक करून नगरपंचायतीचा महसूल त्यांच्या वेतनावर खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला? आधीच नगरपंचायतमधील असलेले कर्मचारी कामात असलेली अव्यवस्था व कामात होणारी ससेहोलपट यामुळे संभ्रमावस्थेत आहेत. यातच नुकत्याच झालेली कंत्राटी कर्मचारी भरती कोणात्याही नगरसेवकाला कसलीही कल्पना न देता झाली असलेने बाकीचे नगरसेवक ,तसेच कर्मचारी गोंधळेल्या अवस्थेमध्ये आहेत.
या बोगस कंत्राटीकर्मचारी भरती प्रकरणाची योग्य प्रकारची चौकशी करणेत यावी.यासाठी भाजपा पाटण तालूकावतीने मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील
विभागिय आयूक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल याना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप पाटण तालुका सरचिटणीस फत्तेसिंह पाटणकर यांनी दिली.
यावेळी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आयशा सय्यद , सोशल माडिया पाटण तालुकाध्यक्ष अनिल बोधे, काशिनाथ विभुते, शिवाजी माने सरचिटणीस युवा मोर्चा व पदाधिकारी ऊपस्थित होते.

0 Comments