वडूज/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
वडूज आगाराकडून खटाव तालुक्यात व्यवस्थित सेवा दिली जात नसल्याने मनसे आक्रमक झाली असून जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आगरप्रमुख आगार प्रमूख चौगूले याना निवेदन दिले. सेवा सुरळीत झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज आगारातील एसटी बस ज्यादा सोडून विद्यार्थी, वृद्ध लोक, महिला व आजारी लोकांच्या पिळवणूक थांबावी कोपर्डी सारख्या घटनेची वाट पाहू नये. व बससेवा सुरू करावी आठ दिवसात बससेवा सुरू केली नाही तर मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते , शाळेतील मुले स्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष सचिन पवार. तालुकाध्यक्ष दिंगबर शिंगाडे, तालुका उपाध्यक्ष सूरज लोहार, सौरभ कुलकर्णी,सागर सेगर,समीर गोरड, सौरभ जाधव, निलेश सोनवणे, विकास फडतरे, दुशांत पवार, मुसांडवाडीचे उपसरपंच असिफ पटेल, प्रीतम घाडगे, रामदास कदम, पंकज घाडगे, संतोष मोरे, गौरव इंगळे, सागर कट्टे व मनसैनिक उपस्थित होते

0 Comments