मायणी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी येथील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप च्या विजय वरुडे व शिवाजी कणसे या दोन युवकांनी आपल्या मिरज व पुणे येथील चार मित्रांच्या समवेत दक्षिण भारत भ्रमंतीसाठी गेल्या आठरा दिवसांपूर्वी सायकल वरून प्रस्थान केले होते. मनात आणलेला हा निश्चयी संकल्प पूर्णत्वाकडे नेत मायणी तुन कन्याकुमारीकडे प्रस्थान करून तब्बल १४०० किमी चे अंतर सध्या सायकलींवरून १३ दिवसात पूर्ण केले आणि मोहीम फत्ते केली . परतीचा प्रवास रेल्वेने करून काल शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मायणी येथे पोहचले. यावेळी मायणीतील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत हार ,बुफे मिठाई चारून त्यांचे स्वागत केले.
ऐतिहासिक गड किल्ले प्रेमी असलेले कन्याकुमारीला निघालेले विजय वरुडे व शिवाजी कणसे यांना अनिल कुलकर्णी सुभाषनगर ,अंबरीश जोशी किर्लोस्कर वाडी,मिलिंद कुलकर्णी मिरजआणि सागर माळदवे पुणे, या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप च्या अन्य चार मित्रांची साथ मिळाली.आश्चर्य म्हणजे यांचा प्रवास हा मोटर,विमान,रेल्वे यांचा नसून तो चक्क पर्यावरण पूरक सायकलवरचा होता.
या सहाही सायकल स्वार साहसवीरांपैकी काहींचे वय ४० वर्षे असून काहींचे ४० वर्षांहून जास्त आहे .परंतु संकल्प पूर्ण करण्याचे धाडस अंगी असणाऱ्या या मराठी मावळ्यांनी १४०० किलोमीटरचा प्रवास शिस्तबद्ध पद्धतीने करून आपली मोहीम फत्ते केली . या प्रवासात दक्षिण भारतात सोने चांदी व्यापारासाठी गेलेले गलाई बांधवांनी गावाकडील या बांधवांच्या कार्याची दखल घेत सेलम,मदुराई,कन्याकुमारी येथे त्यांचा यथोचित सत्कारही केला .
कन्याकुमारी येथे गेल्यानंतर स्वामी विवेकानंद स्मारक,कन्याकुमारी मंदिर,यानंतर रामेश्वरम येथील धनुष्यकोटी हे रामसेतू बांधलेले ठिकाण ,मीनाक्षी मंदिर येथे दर्शन घेऊन कन्याकुमारी ते मिरज हा प्रवास रेल्वेने केला . मिरज येथेही तेथील सायकल व पर्यावरण प्रेमी ग्रुप ,सह्याद्री ग्रुप तर्फे शाल श्रीफळ गुलाबपुष्प ,व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले .
मायणीत या साहस वीरांचे स्वागतासाठी उपसरपंच सुरज पाटील,वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किरण देशमुख ,ग्रामपंचायत सदस्य ,किरण कवडे,रणजित माने ,हेमंत जाधव,शंकर माळी,चंदन वरुडे,राजेंद्र बाबर,राजाराम कचरे,शंकर भिसे,कृषी अधिकारी दीपक घोणे, सोमनाथ माळी,जयंत लिपारे ,मधुकर लिपारे,आबासाहेब माने,सचिन घाडगे,शिंदे,प्रशांत कवडे,प्रमोद महामुनी,डॉ सुमनकुमार देवनाथ,अश्विन माळी, बँक ऑफ इंडिया बँकेचे मॅनेजर अशोक कुंबलवर,जगन्नाथ भिसे यांचे सह अन्य ग्रामस्थांनी शुभेच्छा व अभिनंदन केले.
गतवर्षी मायणी ते बालाजी हे अंतर कमी वेळात पार करून मायणीचा रायडर अशी प्रसिद्धी मिळवलेले मायणीतील पत्रकार सुमित उर्फ दत्ता कोळी व त्यांचे मित्र शाम कवडे यांनी या वर्षी मायणी ते कन्याकुमारी हे १४०० किमीचे अंतर दीड दिवसात पार करून या सायकल स्वरांची प्रत्यक्ष कन्याकुमारीत भेट घेतली व संकल्प पूर्तीचे अभिनंदन केले .यावेळी दत्ता कोळी व शाम कवडे यांनी रामेश्वरम ,कन्याकुमारी,मदुराई,सेलम अश्या ठिकाणांना भेट देत पाच दिवसाच्या या दक्षिण भारताच्या भ्रमंतीमध्ये ३४०० किमीचे अंतर पार करून मायणी येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजता परत पोहचले,यावेळी मायणी येथील नेहरू वाचनालय येथे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला,तसेच ठीक ठिकाणच्या मायणीतील युवा ग्रुप तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला
No comments:
Post a Comment