हवालदारवाडी येथील विजय सावंत यांनी देशपातळीवरील स्पर्धेत कराटे चँम्पियन - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, January 13, 2018

हवालदारवाडी येथील विजय सावंत यांनी देशपातळीवरील स्पर्धेत कराटे चँम्पियन



म्हसवड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
गोहाटी (आसाम ) येथे देश पातळीवरील  'नॅशनल मार्शल आर्ट गेम्स आणि फेस्टीव्हल' या क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालले माण तालुक्यामधील हवालदारवाडी येथील विजय सावंत यांने कराटे 'चँम्पियनशिप' मिळविली.
त्यांना कराटे खेळामधील डॉक्टरेट ( पीएचडी) डिग्री बहाल करुन त्यांचा गौरव करण्यात आला.
ग्लोबल इंटरनॅशनल मार्शल आर्ट फेडरेशन आयोजित देश पाताळीवरील या क्रिडा स्पर्धेत पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एकमेव  माणदेशी विजय पो सावंत हे या स्पर्धेत सहभागी होऊन हि स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे कौतुक केले जात असुन त्यांच्यावर विविध स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
स्पर्धा जिंकुन ते चषक  समवेत त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच क्रीडा क्षेत्रासह आप्त मंडळींनी विजय सावंत याचे जंगी स्वागत केले.
ग्लोबल इंटरनॅशनल मार्शल आर्ट फिडरेशनच्यावतीने बॉक्सिंग,कराटे,मल्लखांब,कुगफू,बेल्ट रेसलिंग, मीऊथाई, किकबॉक्सिंग, इत्यादी खेळामधील प्राविण्य असलेल्या खेळाडुंची देशपातळीवर 'नॅशनल मार्शल आर्ट्स गेम्स आणि फेस्टिवल' चे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते.आसाम राज्यामधील गोहाटी येथील इंनडोअर स्टेडीअम मध्ये झालेल्या या क्रिडा स्पर्धेत देशामधील महाराष्ट्र,गुजरात,ओरिसा,मणिपुर,दिल्ली,पंजाब,त्रिपुरा,मध्यप्रदेश,ऊत्तरप्रदेश,मेघालय इत्यादी १७ राज्यातील खेळाडु या स्पर्धेत सहभागी झाले होते.
विजय सावंत याचे क्रिडा क्षेत्रातील यशाबद्दल  महाराष्ट्र रंग कामगार सेना अध्यक्ष विश्वासराव साळुंखे,महाराष्ट्र रंग कामगार सेना कार्याध्यक्ष धनाजी सावंत,शिवसेनेचे जेष्ट नेते खंडेराव जगताप 
श्रावणी चारीटेबल ट्रस्ट मुंबई.संस्थापक अध्यक्ष संदिप घोरपडे  हवालदारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच
नानासाहेब सावंत,   
शिवसेना माण तालुका  प्रमुख.बाबासाहेब मुलाणी आदींनी अभिनंदन केले.
विजय सावंत हे या क्रिडा खेळासाठी महाराष्ट्रातून एकटे कोच बरोबर् होते  व विजय मिळवून पीएचडी पदवीचा सम्मान मिळविणारे भारताच्या कराटे खेळाच्या इतिहासात
ते पहिले खेळाडु गणले गेले. हि बाब माणवसियांना अभिमानास्पद अशीच आहे.

No comments:

Post a Comment