भीमा कोरेगाव प्रकरणी फलटणच्या रिपाइं पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, January 14, 2018

भीमा कोरेगाव प्रकरणी फलटणच्या रिपाइं पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
भीमा कोरेगाव प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई न करणार्‍या, भाजपा सरकारला रिपाई
गट साथ देत असल्याच्या कारणावरून भाजपा व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचा निषेध करत फलटण तालुकाध्यक्ष हरिष काकडे, शहराध्यक्ष युवराज काकडे, तालुका पुर्वभाग युवाध्यक्ष मनोज आढाव व त्यांच्या सहकार्‍यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, गेल्या पंधरा वर्षापासून रिपाई (ए) या पक्षामध्ये सदस्य पदापासून ते 2011 रोजी नियुक्ती झालेल्या तालुका अध्यक्ष पदापर्यंत सामाजिक व राजकीय काम एकनिष्ठेने पाहिले. त्याच बरोबर पक्षवाढीसाठी फलटण तालुक्यामध्ये अत्यंत तळमळीने काम पाहिले. दलित अत्याचाराबरोबर महिला आत्याचारा किंवा दिव्यांग लोकांसाठी सामान्य जनतेला शासकीय योजना पोहचवण्यासाठी मोर्चे, रास्ता रोको, घंटानाद, धरणे, अमरण उपोषण व इतर आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व शहरातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी रिपाईच्या माध्यमातुन आंदोलने केली.पण रिपाई (ए) हा प्रतिगामी विचारसरणीवर व ध्येय धोरणानुसार चालणारा पक्ष झाला आहे. त्याच बरोबर भिमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही फलटण शहर अध्यक्ष युवराज काकडे, फलटण तालुका पूर्व भाग तालुकाध्यक्ष मनोज आढाव, फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असणार्‍या सर्व शाखा प्रमुखांबरोबर तालुका अध्यक्ष हरिश काकडे सर्वजण एकत्रित राजीनामा देत आहोत.

No comments:

Post a Comment