म्हसवड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
माणदेशी फौंडेशन म्हसवड संचलित माणदेशी कम्युनिटी रेडिओ केंद्राच्या वतीने गुरुवारी ११ जानेवारी २०१८ रोजी हास्य दिनानिमित्त "आनंदी राहण्यासाठी हसा" कार्यक्रमाचे आयोजन न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सहभागी मुले मुली आज ख-या आनंदात होती कि आपण सर्वजण खूप खूप हसणार आहोत. आपणच नाही तर शिक्षक शिक्षिका हि आपल्या बरोबर हसणार मुळीच रागावणार नाहीत. कारण आज होता हास्य दिन.
या कार्यक्रमात सहभागी होते श्री निलेश सरतापे म्हसवड युवा ज्यांनी कुत्रा, मांजर पक्षाचे आवाज काढून मुलांना खुप हसवले अभिनेता दादा कोंडके यांच्या संवादाच्या आवाजाची नक्कल करुन मुलांना आनंदी हास्यात आकंठ बुडवले.
त्यानंतर योग शिक्षक श्री जगन्नाथ लोहार पतंजली योग म्हसवड यांनी मुलांच्या समोर वज्रसनात बसवून वेगवेगळ्या हास्य प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांना हसते केले.
या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलीमा गाडे यांच्यासह शाळेतील सहकारी शिक्षक शिक्षिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत जीवनातील काही कालावधी ताणमुक्त होण्यासाठी वापरला आणि हास्याचा आनंद उपभोगला.
माणदेशी रेडिओच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा परिसरात झाली.
No comments:
Post a Comment