किवळच्या संतापलेल्या शेतकर्‍यांनी वानराच्या टोळीला जेरबंद केले: नुकसानभरपाई न दिल्यास पकडलेली वानरे मंत्रालयात सोडण्याचा दिला इशारा - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, January 12, 2018

किवळच्या संतापलेल्या शेतकर्‍यांनी वानराच्या टोळीला जेरबंद केले: नुकसानभरपाई न दिल्यास पकडलेली वानरे मंत्रालयात सोडण्याचा दिला इशारा


मसूर @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
किवळ सह परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने  शेतकरी व नागरिकांनी वन विभागाकडे वारंवार वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती वनविभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर संतप्त झालेल्या किवळकर शेतकरी व ग्रामस्थांनी सापळा रचून वानरांच्या टोळीला पिंजरा लावून जेरबंद केले. वनविभागाने शेतकऱ्यांची नुकसानभरपाई तीन दिवसात देऊन वानरे घेऊन जावीत अन्यथा किवळ ग्रामस्थ स्वखर्चाने पकडलेल्या किंवा च्या वानरांना नेऊन मंत्रालयात सोडणार असा इशारा संतप्त किवळ ग्रामस्थांनी दिला आहे.

किवळ आणि मसूर पंचक्रोशीत वणारांच्या टोळी ने गेल्या सहा महिन्यात शेतीचे आणि घरांचे प्रचंड नुकसान केले आहे वन विभागाला सांगून ग्रामस्थ थकले,तीन आठवड्या पूर्वी सर्व वर्तमानपत्रातून वन विभागाला वानरे पकडून घेऊन जाण्यास इशारा दिला होता आज पर्यंत एक ही वन विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी गावात आला नाही.मसूर विभागात वानरांनी  टोमॅटो  कणसे  पावटा वांगी ऊस व इतर फळबागा पूर्णपणे फस्त करून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी उध्वस्थ झाला आहे. वानरांनी घराची कौले फोडून  तसेच घरात कोणी नसताना ते पाहून संसारपयोगी साहित्‍याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेली आहे.

गावात वानरांची संख्या पाचशेच्या  वर आहे

चिखली, निगडी, पाडळी हेळगाव या गावातील लोक हि वणारा च्या त्रासाला व शेतीच्या नुकसानी ला वैतागले आहेत.गेली आठ दिवस किवळ ग्रामस्थांनी वानर पकडायची मोहीम हाती घेतली, आज ५० वानर पकडले,
याची माहिती लागताच वन विभागाचे अधिकारी गावात पकडलेली वानरे घेऊन जाण्यास आली असता यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आज ग्रामस्थांनी स्पष्ट सुनावले झालेली नुकसान भरपाई द्या आणि वानर घेऊन जा एक अधिकारी म्हणाला आमच्याकडे वणारा कडून नुकसान झालेवर भरपाईची तरतूद नाही यावर त्यांना ग्रामस्थांनी सांगितले की तरतुदी चा जीआर काढा आणि मग या वानर न्यायला वन विभागाकडे लाखो करोडो हेक्टर जमीन असताना, वन्य प्राणी शेतकऱ्याच्या जमिनीवर येतात कसे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शासनाचा पगार घेतात,  काम काय करतात असा संतप्त सवालही कीवळ ग्रामस्थांनी या वेळी केला.
वन विभागा च्या भोंगळ कारभार या पुढे खपवून घेणार नाही शेतकरी पिकाचे संरक्षण करण्यासाठी काही हि करेल असा इशारा किवळ ग्रामस्थांनी दिला.

मग वानरे तहसीलदाराच्या घरात सोडा

किवळ येथील शेतकऱ्यांनी वानरे पकडली असून ति वानरे घेऊन जावीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी संबंधित विभागांनी काहीतरी पाऊले उचलावीत  शेतकरी संतप्त झाले असून काहीतरी मार्ग काढावा आसा फोन किवळ ग्रामस्थांनी एका अधिकाऱ्यास लावला असता. वानरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आमची नाही नुकसानभरपाई पाहिजे असेल तर वानरे नेऊन तहसीलदाराच्या घरात सोडा असा निर्वाणीचा सल्ला संबंधित अधिकाऱ्यांनी किवळ ग्रामस्थांना  दिला.

बंदोबस्त करता येत नसेल तर कराडचे  वन्यजीव कार्यालय बंद करा

अनेक वेळा तक्रारी करूनही वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत वन विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. अनेकवेळा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात जबाबदारी झटकली जाते. यातून शेतकऱ्यांची व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेकवेळा हिंस्र पशुंचा मानवी वस्तीत वावर होता संबंधित विभागा बघ्याची  भूमिका घेत आहे.हिंस्त्र जंगली श्वापदे मानवावर हल्ला करत आहेत  कराड येथे वन्यजीव कार्यालय असूनही त्यांच्याकडे प्राणी पकडण्यासाठी सुविधांचा अभाव दिसून येतो. प्राण्यांचे व मनुष्यांचे रक्षण होत नसेल तर हे वन्यजीव कार्यालय काय उपयोगाचे असा संतप्त सवाल करून कराडचे वन्यजीव कार्यालयाने ठिकाणी हलवावे अशी मागणी यावेळी किवळ ग्रामस्थांनी केली.

No comments:

Post a Comment