कराड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या स्पर्धेचे काम सुरु असल्याने थांबवण्यात आलेली नगराध्यक्षा आपल्या दारी या अभियानाची आज परत सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत आज मुजावर कॉलनी येथे नगराध्याक्षांनी भेट देवून विविध समस्यांची माहिती घेवून या समस्यांचा त्वरीत निपटारा करण्याबाबत अधिका-यांना सुचना दिल्या.
नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांनी नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम राबवयला सुरुवात केली होती. या उपक्रमास कराडकर नागरीकांचा उर्स्फूत पाठिंबा मिळत होता. मधल्या काळामध्ये नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या महत्वकांक्षी स्वच्छ सर्वेक्षण 2018 या अभियानांतर्गत विविध प्रकारची जबाबदारी पार पाडावी लागल्याने नगराध्यक्षांनी आपला उपक्रम काही काळासाठी थांबविला होता. या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कराड शहर संपूर्ण देशामध्ये 5 व्या क्रमांकावर आहे. याचे श्रेय सर्व कराडकर नागरीकांना तसेच सर्व कर्मचा-यांना जाते. काल या उपक्रमाच्या तपासणीचे काम संपल्यानंतर आज लगेचच नगराध्यक्षांनी आपल्या उपकमाला पुन्हा सुरुवात केली.
मुजावर कॉलनी वार्ड क्रमांक 13 व 14 या दोन्ही वार्डामध्ये जाऊन नगराध्यक्षांनी प्रत्येक नागरीकांशी संवाद साधला, तेथील लाईट,पाणी, रस्ता, डेनेज याबाबतीतील अडचणी समजावून घेवून या अडचणींचे त्वरीत निराकरण करण्याबाबत अधिका-यांना सुचना दिल्या. या वार्डामध्ये मुलभूत सोईंची अगोदर सोय करावी यासाठी प्रशासनाने त्वरीत प्रस्ताव सादर करावेत असे आदेशही नगराध्यक्षांनी संबंधित अधिका-यांना दिले. तसेच या भागातील नागरीकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निराकरण करुन कराड शहरासारख्या या भागातील नागरीकांनाही जास्तीजास्त सोई, सुविधा देण्याचा मानस नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नगराध्यक्षांसोबत जेष्ठ नगरसेवक श्री. विनायक पावसकर, नगरसेविका सौ.सुनंदा शिंदे, श्री.सददाम आंबेकरी, सौ.गजाला सययद यांचेसह नगरअभियंता एम.एच.पाटील व सचिन कोकणे,डेनेज विभागाकडील श्री.अनिल गवळी व फैयाज बारगीर,पाणीपुरवठा विभागाकडील श्री.संजय पवार,विदयुत विभागाकडील राजेंद्र कांबळे, आरोग्य विभागाकडी श्री.देवानंद जगताप, प्रमोद कांबळे इ.अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment