Ticker

6/recent/ticker-posts

फलटणला भाजपच्या तिरंगा एकता यात्रेला प्रतिसाद



फलटण@सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
फलटण भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व मोर्चे आघाड्याचे पदाधिकारी यांच्यावतीने आज दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त  तिरंगा एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

शंकर मार्केट येथे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंमसघाचे फलटणचे कार्यवाहक भास्करजी कुलकर्णी  यांच्या हस्ते पुष्पहार घालून तिरंगा एकता यात्रेची सुरवात करण्यात आली. यानंतर राष्ट्रीय ध्वजाचे पुजन व भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन भाजपच्या सौ नयना भगत, सौ सुभागी रासकर, सौ मनीषा नामदास, सौ अस्मीता निंबाळकर यांनी केले. यानंतर संविधानाचे पुजन व वाचन भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते रामविलास रणसिंग यानी केले. राष्ट्रगीत झाल्यानंतर शकंर मार्केट- श्रीराम मंदीर-गजानन चौक-राजे ऊमाजी नाईक चौक- भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर चौक-छञपती शिवाजी महाराज चौक- क्रांतीसिंह नाना पाटील चौक यामार्गे तिंरगा यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या शेवटी सर्वाना जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणुन तालुकाध्यक्ष सुशांत निंबाळकर उपस्थित होते. तसेच विस्तारक रावसाहेब शिरसागर, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते डाँ वि.रा ञिपुठे, प्रसाद करवा, ऊत्तमराव भोसले, रविद्र फडतरे, राजु काळे, ऊदय माढरे, रविद्र शिदे, प्रल्हाद शिदे, नाना गावडे, पिटु जगताप, राजु पाटील, नाना जाधव, नाना बोबडे, नवा लकडे, नितीन गायकवाड, राजवीर निंबाळकर, शांभवी निंबाळकर, धनीजी घोरपडे सर, सस्ते सर, शिरसागर  सर, कदम सर, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments