पाटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने शुक्रवार दिली. २६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटण शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,पाटण शहरातील लायब्ररी चौकामध्ये सकाळी झेंडावंदन करण्यात आले, भारतमातेचे पुजन करून सामुहिक संविधान वाचन करण्यात आले, तसेच तहसील कार्यालय पाटण येथे पक्षाचे वतीने स्वातंत्र्य सैनिक ,तसेच जेष्ठ नागरीक ,व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, यावेळी महाराष्ट्र शासन निर्मित कथा परिवर्तनाची हे शासकीय योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे वाटप भाजपा जिल्हाउपाध्यक्ष नगरसेवक सागर माने, तालुका सरचिटणीस फत्तेसिंह पाटणकर, महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्षा सौ. आयेशा सय्यद, इ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विस्तारक शेखरजी वडणे , सोशल मिडीया प्रमुख अनिल बोधे,शहराध्यक्ष योगेश महाडीक, काशीनाथ विभुते, गणेश खांडके,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,
सकाळी ११ वाजता तिरंगा एकता दुचाकी रॅलीचा जिल्हाउपाध्यक्ष नगरसेवक सागर माने यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला हि रॅली झेंडा चौकातून चाफोली रोड मार्गाने तहसील कचेरी- मोरे गल्ली मार्गे नागोजीराव पाटणकर वाचनालय येथे विसर्जित करण्यात आली, या तिरंगा एकता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत भिसे,युवा मोर्चाचे शिवाजी माने, जयवंत सुतार, मोरे, अमर पाटील, तुकाराम मोळावडे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


0 Comments