फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनी माळजाई गृहनिर्माण येथिल सुरु असलेल्या अवैध बांधकामाबाबत अधिकार गृहासमोर काँगेसचे नऊ नगरसेवक व नगरसेविका आमराण उपोषणास बसले होते. दुपारी उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, मुख्याधिकारी धैेर्यशील जाधव, सहाय्यक निबंधक पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेतून अनेक अटीवर एकमत होऊन लेखी आश्वासन घेऊन आजचे उपोषण मागे घेण्यात आले.
फलटण शहरातील माळजाई उद्यानालगत सि.स.नं.6468 मध्ये जुना सर्वे नं 651 या मिळकतीवर 19 सप्टेंबर 1965 रोजी बिगरशेती ऑडर्र व ले आऊट रेखांकन मंजुर झाले होते. त्यानंतर परत 12 ऑगस्ट 2014 रोजी ले आऊटमध्ये सुधारणा करण्यासाठी नगरपालीकेकडे प्रस्ताव दिला होता परंतु नगरपालिकेने संबधितांना हा ले आऊट सुधारीत करता येणार नाही असे लेखी कळविले होते.
फलटण नगरपालीकेची दिशाभुल करून त्याठिकाणी हे सि.सि.नं.6468 मध्ये बोगस प्लँट नं: 67 व 68 तयार करून त्याठिकाणी बांधकाम करण्यास सुरवात केली नगरपालीकेतील जावक क्र 14./2017 अनव्ये नगरपालिकेने संबधित बांधकामाला परवानगी दिली होती मात्र तक्रार अर्जावरून दिलेली बांधकाम परवानगी 11 ऑगस्ट 2017 रोजी लेखी पत्र देवुन रद्द केली. परवानगी रद्द केली असतानाही बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू होते या प्रकरणी सर्व संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावीत, बेकायदेशीर बांधकाम तत्काळ पाडावे, बेकायदेशीरपणे नोंदणीकृत करण्यात आलेली संस्था रद्द करावी, या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे यावेळी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीं यावेळी अनेक मुद्याबाबत एकमत केले.
यानंतर मुख्याधिकारी धैेर्यशील जाधव यांनी न.भू.क्र 6468 मध्ये जे क्षेत्र न्यायप्रविष्ट नाही त्या क्षेत्रातील खुल्या जागेभोवती घातलेले कुंपण सोमवार दिनांक 29/1/2018 पासून काढून टाकत आहोत तसेच न्यायप्रविष्ट असलेले प्लॉटचे क्षेत्र 1304.34 चौ.मी व बांधकाम क्षेत्र 1334.6 चौ.मी या क्षेत्रात न्यायालयात वाद असल्याने मा. न्यायालय यांचे निर्णयानुसार पुढील कार्यवाही करणेत येईल. सदर जागा ही अभिन्यासाठी खुली जागा असून त्यावर कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नाही असा फलक लावण्यात येईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले तसेच बेकायदेशीर बांधकामाबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. यानंतर काँगेसच्या नऊ नगरसेवक तसेच नगरसेविका यांनी उपोषण मागे घेतले.
उपोषणस्थळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अँड.नरसिंह निकम, महेंद्र बेडके, दिगंबर आगवणे, गटनेते अशोकराव जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक सचिन अहीवळे, प्रविण आगवणे, नगरसेविका मंगलादेवीनाईक निंबाळकर मदलसा कुंभार, ज्योती खरात, मिना नेवसे, ऋषिराज नाईक निंबाळकर, अँड. सचिन शिंदे, अँड खलाटे, तुकाराम शिंदे, महीला काँग्रेस तालुकाध्यक्ष सौ.सावंत, शहराध्यक्षा स्विटी शहा, शिवाजीराव फडतरे, बाळासाहेब भोसले, काका खराडे उपस्थित होते या उपोषणास भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.

0 Comments