Ticker

6/recent/ticker-posts

पाटण तालुका पत्रकार संघाचा ९ वा सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात (सविस्तर बातमी आणि व्हिडिओही)



पाटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क                  
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटण तालुका पत्रकार संघाने शालेय विद्यार्थ्यांचा आयोजित केलेला ९ वा  "सांस्कृतिक महोत्सव २०१८" शिवांजली मल्टीपप॔ज मंगल कार्यालय नाडे ( नवारस्ता ) ता. पाटण येथे विद्यार्थी - पालक, नागरीक यांच्या उस्फुर्त प्रतिसादात आणि जल्लोषात साजरा झाला. देशभक्तीपर गाणी, पारंपरिक नृत्य, प्रबोधन पर  पथ नाट्य,  विनोदी नाटीका कोळी नृत्य अशा अनेक विविधरंगी सादरीकरणाने "सांस्कृतिक महोत्सव" बहरून गेला. विद्यार्थ्यांच्या या अदाकारीला उपस्थितांनी जल्लोषी प्रतिसाद दिला. यावेळी पाटण चे तहसीलदार श्री रामहरी भोसले, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय पवार, नाडे गावचे सरपंच विष्णू पवार, नाडोलीचे सरपंच अरविंद कुंभार,सामजिक कार्यकर्ते  धनाजी केंडे, प्रदिप कुंभार,संजय डूबल अनिल बोधे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या सप्तगुणांच्या कलागुणांना वाव आणि त्यांच्या सांस्कृतिक अदाकारीला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी सर्व शाळां, महाविद्यालयांना  पाटण तालुका पत्रकार संघाच्या  वतीने  सन्मान चिन्ह व  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले. उपाध्यक्ष संभाजी भिसे यांनी सांस्कृतिक महोत्सवाची प्रस्तावना केली. सचिव भगवंत लोहार यांनी निवेदक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. कार्याध्यक्ष बाबासो सुतार, विभाग प्रमुख नानासाहेब पवार, उपाध्यक्ष धिरज कदम, सुरेश संकपाळ, योगेश हिरवे, विलासराव माने, विक्रांत कांबळे, नितीन खैरमोडे, जितेंद्र मोळावडे, वैभव देवकर, विद्या म्हासुर्णेकर आदी सर्व पत्रकारांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. शेवटी बाळासाहेब उर्फ राजू पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments