Ticker

6/recent/ticker-posts

सारथी सामाजिक विकास संस्थेतर्फे प्रजासत्ताकदिनी ब्लॅंकेट वाटप



सिद्धेश्वर कुरोली @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
येथील सारथी सामाजिक विकास संस्था दरवर्षी २६ जानेवारीला गरीब व्यक्तींसाठी उपक्रम राबवते, दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सारथीने समाजातील गरीब व गरजु लोकांना ब्लँकेट वाटप करून त्यांच्या आयुष्यात थोडीशी ऊब आणण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमास मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षित गाला यांनी ही मोलाचे सहकार्य केले. या वेळी सारथीचे अध्यक्ष गुरुप्रसाद गोसावी, चंद्रसेन देशमुख,संपतराव देशमुख, दिलीप साठे, संतोष पाटोळे, अक्षय गांधी, अजित देशमुख, विवेक फडतरे, श्रवण जोशी, श्रेयस वाडेकर, मनोज कांबळे आदी उपस्थित होते.

देव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होता 

लोक म्हणतात की देव मंदिरात मूर्तीत आहे पण खरच आम्हाला देव ब्लँकेट देताना त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता
- गुरुप्रसाद गोसावी
अध्यक्ष, सारथी सामाजिक विकास संस्था

Post a Comment

0 Comments