म्हासुर्णे@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खटाव तालुका हे नाव उच्चारलं की पहिला शब्द ओठावर येतो तो म्हणजे दुष्काळी. घाटमाथ्यावर वसल्यामुळे जणू कायमचा शिक्का कपाळावर राहणार की काय? अशी भीती कायम व्यक्त केली जाते. परंतु, हळूहळू ही परिस्थिती बदलू लागली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील अनेक गावांचा चेहरा-मोहरा बदलला असून ही गावे जलयुक्त होऊ लागली असून दक्षिण-पूर्व भागातील दुष्काळी म्हासुर्णेहीही आता दुष्काळमुक्त होण्याच्या प्रक्रियेसाठी सरसावले आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत येथे होणार्या कामांसाठी या भागात तब्बल सव्वा कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असून कृषी, लघुपाटबंधारे व वनविभागाच्या माध्यमातून याचा आराखडा नुकताच तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच या कामांना प्रारंभही होणार आहे.
खटाव तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात सन 2017-18 अंतर्गत म्हासुर्णे गावाचा सहभाग आहे.सुमारे 72 हेक्टर क्षेत्रावर कामे प्रास्तावित आहेत.या कामासाठी सुमारे एक कोटी सव्वीस लाखाचा आराखडा निश्चित केला आहे .म्हासुर्णे गावाचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक पदाधिकारी,व ग्रामस्थांची मदत घेवुन जलयुक्त शिवार योजना म्हासुर्णे गावात प्रभावी पणे राबवण्यासाठी कृषी विभाग,पाटबंधारे विभाग,वन विभाग सज्ज झाला आहे.
गावातील शेतीचा सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सिंमेट बंधारे,नाला बांध,जुन्या बंधारातुन गाळ काढणे,ताली घालणे,माती नालाबांध दुरुस्त करणे,साखळी सिंमेट बंधारे बांधणे,पाझर तलाव दुरुस्त करणे,केटीआर कॉग्रेट बंधारा दुरुस्त करणे,वळण बंधारा दुरुस्त करणे,विहिर पुनर्भरन करणे,खोल सलग समताल चर काढणे,या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.म्हासुर्णे गावात अस्तित्वात मंजुर कामे 72 हेक्टर क्षेत्रावर एक कोटी सव्वीस लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे .नव्याने हाती घेण्यात आलेल्या कृषी विभाग कामा मध्ये 72 हेक्टर क्षेत्रात एक कोटी सव्वीस लाखाचा निधी प्रास्तावित आहे .कृषी विभाग या कामामध्ये 3गटामध्ये 60हेक्टर मध्ये ताली घालणे या कामासाठी चार लाख तीस हजार निधी खर्च होणार आहे,दोन माती नालाबांध दुरुस्तीसाठी तीन लाख निधी खर्च होणार आहे,दोन साखळी सिमेंट बधारा उभारणी साठी वीस लाख खर्च होणार आहे ,दहा सिमेंट बांध दुरुस्ती साठी पंचवीस लाख निधी खर्च होणार आहे.असा कृषी विभागाकडुन एकुण52 लाख 30हजार निधी खर्च होणार आहे .तसेच लघुपाटबंधारे विभागामार्फत पाझर तलाव दुरुस्ती साठी तीस लाख निधी खर्च होणार आहे.केटीआर (कॉग्रीट)बंधारे दुरुस्तीसाठी दहा लाख निधी खर्च होणार आहे.
भविष्यात म्हासुर्णे होणार पाणीदार गाव
दोन वळण बंधारा कामासाठी दहा लाख निधी खर्च होणार आहे ,तीन विहिर पुर्नरभरण या कामासाठी 42हजार निधी खर्च होणार आहे.अशा पध्दतीने लघु पाटबंधारा विभाग यांच्या कडुन एकुण 50लाख 42हजार एवढा निधी खर्च होणार आहे .तसेच वन विभाग यांच्या कडुन 3गटामध्ये 12हेक्टर वर खोल सलग समतल चर (डि.पी.सी.सी.टी.)या कामासाठी 8लाख34हजार निधी खर्च होणार आहे .व कराड लघु पाट बंधारे विभागाच्या मार्फत साखळी बंधारा या कामासाठी 15लाख निधी खर्च होणार आहे असा पध्दतीने कृषी विभाग ,लघुपाटबंधारे विभाग ,वन विभाग,यांच्या कडुन एकुन 1 कोटी 26 लाख निधी येणार्या काही दिवसात खर्च होणार आहे.गावामध्ये लाखो रुपये खर्च करुन जलयुक्त शिवार योजनेतुन कामे साकारली आहेत.म्हासुर्णे गावाची वाटचाल टँकरमुक्त दिशेने वाटचाल सुरू होण्यास मदत होईल. भविष्यात म्हासुर्णे गाव पाणीदार गाव म्हणुन नव्याने ओळखले जाईल.कृषी सहाय्यक आदरलिंगे मँडम यांनी सातत्याने बैठका घेवुन जलयुक्त कामाचा पाठपुरावा करण्यात आला.म्हासुर्णे गावातील सरपंच व सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ यांचे ही योजना राबवण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.

0 Comments