कोयनानगर @ संजय कांबळे यांजकडून
कोयना धरणामुळे राज्याने तिमिराकडून तेजाकडे जाण्याची कामगिरी केली आहे.ज्याच्या त्यागामुळे हे शक्य झाले ते विकासाचे सैनिक असणारे कोयनाधरणग्रस्त आजही तिमिरात व पारतंत्र्यात आहेत.येत्या 23 जानेवारी पर्यंत कोयना धरणग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबत उदासीनता दाखवणा-या शासनाने तातडीने कोयनेचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.या प्रमुख मागणीसाठी 23 जानेवारीला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर कोयना धरणग्रस्त ठिय्या आंदोलनाने शासनाला जाग आणणार आसुन कोयना धरणग्रस्ताची ही अखेरची लढाई आसून या आरपारच्या लढाईत शेंडी तुटो अथवा पारंबी कोयना धरणग्रस्ताचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी कोयना धरणग्रस्ताच्या विराट मेळाव्यात व्यकत केला.कोयना धरणग्रस्ताचे पुनर्वसन सातारा जिल्हयातच करण्यात यावे अशी प्रमुख मागणीने कोयनानगर दणाणून गेले.
कोयनानगर येथे तीन मंदिरात कोयना धरणग्रस्ताच्या विराट मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी शलाका पाटणकर ,मालोजीराव पाटणकर ,हरीषचंद्र दळवी ,बळीराम कदम , रमेश जाधव ,दाजी पाटील ,शिवाजी सालूंखे ,महेश शेलार ,अर्जुन सपकाळ,दाजी शेलार,संजय लाड ,संभाजी चाळके,चैतन्य दळवी ,श्रीपती माने ,ज्योतीराम थोरवडे ,सचिन कदम,आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ.भारत पाटणकर पुढे म्हणाले की कोयना धरणग्रस्ताना आजपर्यंत घरबांधणी शौचालय अनुदान निर्वाहभत्ता या मूलभूत गोष्टी बरोबर पर्यायी जमिनीचे वाटप करण्यास शासन असमर्थ ठरले आहे.सोलापूर जिल्हयात कुसळ सुध्दा न उगवणा-या जमिनी कोयना धरणग्रस्ताना देण्याऐवजी कोयनेच्या पाण्या शेजारीच त्यांना पर्यायी जमीन देवून कोयना धरणग्रस्ताचे पुनर्वसन सातारा जिल्हयातच करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment