फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
थकबाकीदार असलेच्या कारणावरून विचुर्णी कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सदस्यांना अपात्र करत पुढील पाच वर्षे निवडणूक उभे राहता येणार नसल्याचा आदेश सहाय्याक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार अंकुश हरीबा नलवडे रा. विंचूर्णी यांनी विंचूर्णी सहकारी सेवा सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या विरोधात थकबाकीदार असल्याची तक्रार पुराव्यानिशी दाखल केली होती. यावर सहाय्यक निबंधक फलटण यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क अ (अ)(ब)प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सहाय्यक निबंधक फलटण यांनी संचालक अनिलकुमार केशवराव निंबाळकर, उत्तम साहेबराव भोईटे, शहाजी कृष्णराव गायकवाड, हिरामण तोताराम भोई, बापूराव बाबुराव अहिवळे, बाळासो हनुमंत इथापे,सौ. विजया भीमराव निंबाळकर, या सात जणांचे विरोधात दाखल करण्यात आलेले पुरावे सयुक्तिक असलेने त्यांना या पदावरील अर्हता धारण करता येणार नाही. त्यामुळे उक्त संचालक यांना आदेशानुसार दिनांकापासून पाच वर्षांच्या मुदतीत कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचे सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, स्विकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाहीत असा आदेश देण्यात आला.
फलटण तालुक्यातील अनेक सेवा सोसायटीच्या संचालकांनी कर्ज फेडले नसल्याने त्या त्या सोसायट्यांचे थकबाकीदार संचालक यांना या कारवाईला सामोरे जावे लागणार का ? कालच आमच्या दैनिक सत्य सह्याद्रीने याबाबत धुळदेव सोसायटीबाबत बातमी प्रकाशित केली होती आता धुळदेव सोसायटीच्या थकीत कर्जदार संचालकांच्या विरुद्ध अशी कारवाई होणार का हा प्रश्न सभासद विचारत आहेत.
No comments:
Post a Comment