पाटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पाटण मधील मनसैनिकांशी धावती भेट घेऊन मनसे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्यांशी बातचीत केली.
राजसाहेब ठाकरे हे वैयक्तिक कामासाठी कोकण दौर्यावरती निघाले होते. पाटण मधील कार्यकर्तांनी राजसाहेबांचे झेंडा चौक पाटण येथे स्वागत केले त्यावेली राजसाहेबांनी थोडा वेल थांबून कार्यकर्तांशी बोलणे केले. मनसे चे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्यांशी त्यांनी वैयक्तिक चौकशी केली आणि मनसे चे पाटण मधील कामाची थोडक्यात विचारपुस केली.
नेते बाला नांदगावकर साहेब आणि हर्षद देशपांडे, मनोज चव्हाण हे राजसाहेब ठाकरे यांच्यांसोबत होते. पाटण मधील मनसे चे शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, दादासो सुर्वे, हणमंत पवार, नानासो पवार आणि मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment